मराठी

प्रादेशिक संचालकांच्या उपस्थितीत पींपळगाव बैनोई या आदर्श गावाची थकबाकीमुक्तीकडे वाटचाल

थकबाकीमु्क्त ६७ शेतकऱ्यांचा सन्मान

अमरावती,दि.१७ – ‘वाटर कप’ मध्ये आदर्शगाव म्हणून सन्मानित झालेल्या महावितरण नांदगाव खंडेश्वर उपविभागाअंतर्गत असलेले पींपळगाव बैनोई या गावाने संपूर्ण गाव कृषीपंप थकबाकीमुक्त करण्याच्या नविन आदर्शाला सुरूवात केली आहे.याची सुरूवात म्हणून आज एकाच दिवशी येथील ६७ शेतकऱ्यानी नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या उपस्थितीत १२ लक्ष ७९ हजार रूरपयाचा भरणा करत थकबाकीमुक्त झाले आहे. कृषी धोरण २०२० नुसार वसूल झालेल्या थकबाकीतून ३३ टक्के रकमेचा खर्च हा गावाच्याच विजेच्या पायाभूत विकासाठी करण्यात येणार आहे. यावेळी प्रादेशिक संचालकांच्याहस्ते थकबाकीमु्क्त झालेल्या शेतकऱ्यांना थकबाकीमु्क्तीचे प्रमाणपत्र देऊन ,तर उत्कृष्ट काम करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांनाही  सन्मानित करण्यात आले.
पींपळगाव बैनोईच्याय सरपंचा शरयू पंडित यांच्या प्रमुख उपस्थितत पार पडलेल्या या थकबाकीमुक्ती मेळाव्याला अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर,अधिक्षक अभियंते दिलीप खानंदे,हरिष गजबे, सहाय्यक व्यवस्थापक रूपेश देशमुख ,कार्यकारी अभियंते भारतभूषन औगड,अनिरूध्द आलेगावकर,विलास शिंदे,अजय पंडीत यांच्यासह पींपळगाव बैनोईचे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रादेशीक संचालक म्हणाले की,संपूर्ण जनता कोरोनाच्या संकटात घरात बंदीस्त झाली असतांना त्यांचे घरातील जीवन सुसह्य केले ते केवळ महावितरणने.पैसे नसले तर घराचा व्यवहार कसा चालवावा हा सामान्य मानसाचाच प्रश्न महावितरणलाही लागू होतो.त्यामुळे गेल्या वर्षभराची वसूलीच ठप्प पडल्याने महावितरणने आपला गाडा चालवावा तरी कसा याबाबत ग्राहकांने निश्चितच विचार करण्याबाबत त्यांनी यावेळी आग्रह धरला आणि कृषीपंपासोबत घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांनीही वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन  केले.
तसेच कृषी धोरण २०२० ची माहिती देतांना या धोरणात भरघोस सवलतीत शेतकऱ्यांना थकबाकीमु्क्त होण्याची संधी आहे.तसेच मागेल त्याला वीज जोडणी देण्याचेही उध्दीष्ट आहे, त्याचबरोबर वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के खर्च त्याच गावासाठी करण्यात येणार आहे. सोबत ग्रामपंचायतीने /शेतकऱ्यांनी सौर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना दिवसालाही वीज पुरवठा करण्याचे उध्दीष्ट या धोरणाचे असल्याने याचा फायदा हा स्थानिक शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे प्रादेशिक संचालकांनी यावेळी सांगीतले.
यावेळी मुख्य अभियंता यांनीही पहिल्या वर्षी ५० टक्के थकबाकी भरा आणि आपले वीजबिल कोरे करा या टॅगलाईनचा संदर्भ देत पीपंळगाव बैनोईसोबत इतर गावातील शेतकऱ्यांनीही थकबाकीमु्क्तीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच पींपळगाव बैनोईला आदर्श गावाची केवळ पदविच नाही तर १ कोटीचे रोखड बक्षिस मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे अजय पंडित यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगीतले की महावितरण ही शासकीय कंपनी आहे. शासकीय यंत्रणाच टिकने सर्वसामांन्याच्या हिताचे असते त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Related Articles

Back to top button