मराठी

शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ- संतोष ढवळे

यवतमाळ/प्रतिनिधी दि.२०शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि गरज पडल्यास 20 टक्के राजकारण करते. यवतमाळात सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात सुध्दा जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केले. ते तीन फोटो उमरसरा परीसरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहर शिवसेनेच्या वतीने यवतमाळातील विविध भागात जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात येत आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी ही कार्यालय उघडण्यात येणार आहे. नागरीकांनी आपल्या समस्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात आणाव्या आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असेही संतोष ढवळे यांनी सांगीतले. शिवसेनेचे कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांची सुध्दा जनतेशी नाळ जुळलेली आहे. म्हणूनच यवतमाळात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असतांना शिवसेनेच्या नेत्यांनी वैयक्तीक लाखो रुपयांचा  निधी उपलब्ध करुन दिला होता. मागील विधानसभा निवडणूकीत भाजपा सेनेची युती असल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळाली नव्हती. तरीही अपक्ष राहुन आपण जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. अपक्ष असतांनाही मतदारांनी तब्बल चाळीस हजार मते आपणास दिली होती, यावरुन जनतेचे आपल्यावर प्रेम असल्याचे सिध्द होत असल्याचे संतोष ढवळे म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने खासदार भावनाताई गवळी यांच्या सुचनेनुसार शहरात जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी शहरातील वेगवेगळया भागात जनसंपर्क कार्यालय उघडण्यात येतील अशी ग्वाही शहरप्रमुख पिंटु बांगर यांनी दिली. याप्रसंगी उपशहर प्रमुख चेतन सिरसाठ, विभाग प्रमुख प्रदीप नस्करी, शाखा प्रमुख किशोर वानखडे, सोनू चित्ते, रोशन सूर्यवंशी, रवी दुबे, बाळासाहेब जयसिंगपुरे, सागर दुधे, रमेश मेश्राम, भीमराव पठाडे, संतोष देवतडे, विजय नागदिवे, संजय झोडापे, बंडू नाकतोडे, संजय कोल्हे, विकास शेळके, कटेश तायडे, प्रफुल कोडापे, विशाल  बरोरे  तसेच अनेक शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

  • मुंबई पॅटर्न यवतमाळात

मुंबई मध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्तेक भागात शिवसेनेची  शाखा कार्यालये उघडण्यात आली आहे. त्याच धरतीवर यवतमाळात सुध्दा जनसंपर्क कार्यालय उघडण्याच्या सुचना मी शिवसेना पदाधिका-यांना दिल्या आहे. आज उमरसरा परीसरात जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्तेक शिवसैनिक सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे. पक्षाचे ध्येयधोरण तसेच सरकारी योजना या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसाधारण नागरीकांपर्यन्त पोहचणे गरजेचे  आहे.

 

 

Related Articles

Back to top button