प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांत पाचशे कोटींचा घोटाळा उघडकीस

नवीदिल्ली/दि.२७ – प्राप्तिकर विभागाने (IT) विभागाने एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. त्याअंतर्गत ५०० कोटी रुपयांच्या बनावट बिलातून रोख रक्कम काढून घेणा-या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. देशभरातील अनेक राज्यांत छापे टाकण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट नेटवर्कद्वारे चालविले जात होते. यात एन्ट्री ऑपरेशनद्वारे बनावट बिले तयार केली गेली. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने अनेक राज्यांत ४२ ठिकाणी छापे टाकले. यात दिल्ली, एनसीआर, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने या छाप्यात ५ कोटी रुपयांची रोकड, १७ बँक लॉकर व मालमत्तांमध्ये बेनामी गुंतवणूक तसेच शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी जप्त केल्या आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नुसार गुप्त माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण नेटवर्क उघड केले आहे. यात बिचौलिया, रोख हँडलर, फायदा झालेले लोक आणि कंपन्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५०० कोटींची कागदपत्रे व प्रवेशिका सापडल्या आहेत. छापे टाकून संजय जैन व त्यांच्या कुटुंबीयांसह अन्य लाभाथ्र्यांसह २३ कोटी ३७ लाखांची रोकड व २.८९ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. या बनावट एंट्री ऑपरेशनसाठी ब-याच बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती छाप्यातून उघडकीस आली आहे. या सर्व बनावट कंपन्या बनावट बिलांच्या माध्यमातून बेनामी पैसे आणि रोख रक्कम काढत असे. या बनावट कंपन्यांचे वैयक्तिक कर्मचारी qकवा सहकारी यांना डमी डायरेक्टर qकवा पार्टनर बनविले गेले. या लोकांची सर्व बँक खाती या एंट्री ऑपरेटरद्वारे व्यवस्थापित केली गेली.
फायदा झालेल्यांची मालमत्तांत गुंतवणूक
छाप्या दरम्यान अशी माहिती मिळाली आहे, की असे एन्ट्री ऑपरेटर, त्यांचे बनावट भागीदार कर्मचारी रोख रक्कम वापरत असत. या प्रकरणात ज्या लोकांना पकडले गेले आहे, त्यांच्यात बहुतेक सर्व बँक खात्यांचे मालक आणि लाभार्थी होते. या लोकांच्या नावेही लॉकर आढळले आहेत. या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावेही खाते उघडण्यात आले आहे. ज्यांना फायदा झाला, त्यांनी रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही मालमत्ता मुख्य शहरांमध्ये आहे.