मराठी

कोरोनाकाळात सोनेतारण कर्जात वाढ

मुंबई/दि.११  – सोन्याच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे कोरोना काळात लोक सोने तारण ठेवून कर्ज घेत आहेत. यामुळे सोन्याचे कर्ज एनबीएफसीच्या अॅसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये वाढ होत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) एका अहवालात ही माहिती देण्यात आली.
अहवालानुसार, संघटित सोने कर्ज वित्तीय वर्ष २०२०च्या तीन लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत वित्तीय वर्ष २०२१ मध्ये वाढून चार लाख पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, देशातील स्तरावर सोन्याच्या किमतीत २८ टक्क्यांच्या तेजीने सोन्याच्या कर्जात मागणी वाढली आहे. कर्जदारांना जुन्या सोन्यावर वाढलेल्या किमतीवर कर्ज मिळाल्याचा फायदा झाला. दुसरीकडे, कर्जदात्यांना त्यांचे सध्याचे कर्ज आणि उच्च मागणीवर नीचांकी लोन-टू-व्हॅल्यू (मूल्यासाठी कर्ज) प्रमाणाचा फायदा मिळाला. सोन्याच्या उच्च किमती आणि कोरोनाच्या काळात वित्तीय संकटाच्या काळात लोक सोने विकतील, असे मानले जात होते; मात्र ग्राहकांनी सोन्याची विक्री करण्याऐवजी सोन्याचा उपयोग सोने कर्ज घेऊन आपल्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी केला.
यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट कामगिरी केली, त्यामुळे संकटकाळात होणाऱ्या विक्रीत घट आली. अहवालानुसार, कोरोनादरम्यानच्या मागणीत भारताची प्रमुख गोल्ड लोन एनबीएफसीचा (बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या) गोल्ड लोन एयूएम (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) वाढवला. अहवालानुसार, २०२० च्या दुसऱ्या तिमाही मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्सचा एयूएम दरवर्षाच्या आधारावर अनुक्रमे १५ टक्के आणि ३३.४ ने वाढला आहे. केरळस्थित फेडरल बँकेने २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत दरवर्षाच्या आधारावर सोने कर्जात ३६ टक्क्यांची वाढ सांगितली आहे. इंडियन बँकेचा सोने कर्जाचा सरासरी आकार १० टक्के वाढून ८८ हजार रुपयांवर पोहोचला; मात्र औद्योगिक चर्चा आणि माध्यमातील आलेखातही सोन्याच्या कर्जाच्या वाढत्या मागणीचा उल्लेख केला आहे. अहवालानुसार, कोरोना काळात बँकांनी आकर्षक सोने कर्जाची योजना लाँच केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी.आर. म्हणाले, की सोने कर्ज उद्योग पारंपरिक रूपात छोटा व्यवसाय आणि कुटुंबासाठी आकस्मिक गरजेच्या वेळी एक विश्वासार्ह मदत राहिली आहे. सोने कर्ज असंघटित कर्ज व्यवसायाशिवाय भारतात गोल्ड लोनचा नियमबद्ध संस्थात्मक आराखडा गेल्या काही दशकांत पूर्ण देशात विस्तारला आहे, जो निश्चित रूपात एक चांगला संकेत आहे.

Related Articles

Back to top button