मराठी

नकारात्मकतेनंतर चार महिन्यांनी

घाऊक महागाई दरात वाढ

मुंबई/दि.१४ –  वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक दरातील महागाईबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ऑगस्टमध्ये घाऊक महागाई वाढली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये 0.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये तो -0.58% होता. केंद्र सरकारने म्हटले आहे, की घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई चार महिन्यांपर्यंत नकारात्मक राहिली; परंतु ऑगस्टमध्ये ती वाढली. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमधील डब्ल्यूपीआय वजा 1.57% होता. त्याच वेळी ते मेमध्ये -3.37%, जूनमध्ये -1.81% आणि जुलैमध्ये -0.58% होते.

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थ, फळे आणि भाज्या असलेले पेये, चामड्यांशी संबंधित उत्पादने, लाकूड व लाकूड उत्पादने, औषधे, औषधी रसायने आणि भाजीपाला उत्पादने, धातू, विद्युत उपकरणे, साधने आणि वाहतुकीच्या उपकरणांच्या किंमती वाढल्या. ऑगस्टमध्ये अन्नधान्यांची महागाई 3.84 टक्के  होती. बटाट्याच्या किंमतींमध्ये 82.9३ टक्क्यांची वाढ झाली. भाज्यांचा महागाई दर 7.03 टक्के होता. ऑगस्टमध्ये इंधन आणि वीज चलनवाढीचा दर 9.68 टक्के होता. ऑगस्टमध्ये उत्पादनांचा महागाई दर जुलैमध्ये 0.51 टक्क्यांवरून 1.27 टक्क्यांवर गेला आहे. ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 17.44 टक्के घट झाली. त्याचबरोबर, इंधनाचे दर, विशेषत: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 9.7 टक्क्यांनी खाली आले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे, की महागाईचा दर अजूनही खूपच जास्त आहे. त्यामुळे व्याज दर बदलले गेले आहेत. व्याज दर कमी केले तर महागाईचा धोका आणखी वाढेल. ऑक्टोबर २०२० ते मार्च २०११ या कालावधीत महागाई कमी होईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button