मराठी

घरकुल योजनेतील पहिल्या टप्यातील रक्कम वाढवुन द्या

ब्रिक्स मानवाधिकार मिशन यांची मुख्याधिका:यांकडे मागणी

वरुड दि.१४ – ग्रामीण घरकुल योजनेतील पहिल्या टप्यातील रक्कम वाढवुन द्या, अशी मागणी ब्रिक्स मानवाधिकार मिशन यांनी जिल्हा परिषद मुख्याधिका:यांकडे केली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, शासन ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत आपण एकुण १ लाख ३८ हजार देण्यात येते व शहरातील ही रक्कम जास्त देण्यात येते हा दुजाभाव कमी करुन शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाची रक्कम समसमान देवुन ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थीला घर उभारणी करिता सक्षम मदत करावी कारण घरकुल ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील त्याला लागणारा खर्च समसमान येतो घराला लागणारे मटेरियल सिमेंट, लोहा विटा तसेच मजुरी ही समसमान असते त्यामुळे हा दुजाभाव दुर करुन दोन्ही भागातील घरकुलाची रक्कम समांतर करुन ग्रामीण भागातील लोकांना न्याय द्यावा तसेच सुरुवातीला देण्यात येणारी रक्कम ही फार कमी असल्यामुळे ती वाढवुन द्यावी, अशी मागणी ब्रिक्स मानवाधिकार मिशन यांनी जिल्हा परिषद मुख्याधिका:यांकडे केली आहे.
यावेळी अण्णासाहेब भोंगाडे, राजेंद्र घाटोळे, अक्षय मस्की, रितेश राईकवार, आकाश येलकर, प्रविण चिंचमलातपुरे, रवि गहलोद, गणेश कुसराम, अभित चौहान, संदेश दोड, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.

Back to top button