मराठी

लखाड ते निमखेड बाजार रस्तावरील पुलाची उंची वाढवा 

नागरीकांंना मुठीत जिव घेवून करावा लागतो प्रवास

अंजनगाव सुर्जी/दि.२६ – अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड निमखेड बाजार रस्तावरीवल पुलाची उंची फारच कमी असल्याने नेहमीच हा रस्ता बंद राहतो त्यात खिराडा जवळील चांदसुर्या नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने रोजच अनेक लोकांना दिवसभर पाणी कमी होण्याची वाट पाहवी लागते या बाबत अनेक निवैदणे व वृत्त पत्रात बातम्या प्रकाशित केल्या पंरतु प्रशासनाने काहीही उपाययोजना न केल्याने अन्यथा २८ सष्टेबर पासुन चांदसुर्या नदिवर आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे उपतालुका प्रमुख ऋषिकेश वाघमारे यांनी दिलेल्या निवेदणात म्हटले आहे.
तालुक्यातील चिचोना,निमखेड  बाजार सावरपाणी हिरापूर खिराडा या गावांचि बाजार पेठ शासकीय कार्यालये महाविघालये व सर्वात महत्त्वाचे म्हणजे दवाखाने अंजनगाव सुर्जी ला असुन या मुख्य मर्गावरील पुलांच्या उंच्या फारच कमी असल्याने अनेकवेळा रस्ता बंद राहतो त्यात खिराडा जवळील चांदसुर्या नदिवरील पुलाची उंची फारच कमी असल्याने या पुलामूळे पाचही गावातील नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जर अंजनगाव ला गेलो तर घरी परत येण्याची आशाही नसते त्यात बाजार पेठ अंजनगाव असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी जाता येत नाही व माल घरातच खराब होतो त्या मूळे शेतकऱ्यांवर आणखी एक नवै संकट विघ्यार्थांना शिक्षणापासुन वंचित राहव लागते व सर्वात मोठी समस्या म्हणजे रुग्नाची हा भाग मेळघाट जवळ येत असल्यामुळे या अनेक गावात रुग्नालये नाहीत व रुग्नाना अंजनगाव ला जाव लागते पंरतु रोज पुलावरुन पाणी वाहत असल्याने रुग्नाना फार त्रास सहन करावा लागतो तर काही रुग्न तर बिना उपचाराचे दगावतात पंरतु याबाबत कोणीही दखल घेत नाही अनेकवेळा निवेदने दिली वृत्त पत्रात बातम्या सुध्दा प्रशिध्द झाल्या पंरतु निघरघट्ट प्रशासन व लोकप्रतिनिधी फाक्त आश्वासने देतात पंरतु अनेक वर्षाचा प्रलबित प्रश्ना कडे लक्ष देत नाही म्हणून प्रहार,अखील भारतीय भष्ट्राचार निर्मूलन समिती शेवटी आंदोलन करण्याची भूमिका घेतली असुन २८सष्टेबर पर्यत यावर तोडगा न निघाल्यास २८ सष्टेबर पासुन चांदसुर्या नदिवर आंदोलन करण्याचा ईशारा उपविभागीय अधिकारी वि.प्रा.सार्वजनिक बांधकाम विभाग अंजनगाव सुर्जी यांना दिलेल्या निवेदणात म्हटले असुन निवेदन देते वेळी,……निवेदन देते वेळी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख शंभु मालठाणे,तालुका प्रमुख प्रदिप निमकाळे,अनंत मते,दिपक अढाऊ,सुजित काठोळे,अंकुश पाचघरे,आशिष मानकर,गोपाल बुडळकर,अमोल अढाऊ,..अनेक कार्येकर्त होते,
Back to top button