मराठी

नॅशनल पेमेंट सिस्टीममध्येवाढले 70 लाख सभासद

मुंबई/दि. २० – पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) अटल पेन्शन योजना (APY) आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) संबंधी डेटा जाहीर केला आहे. या योजनांत एक वर्षात सामील होणा-यांची संख्या 22 टक्क्यांनी वाढली आहे. यासह राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत विविध योजनांमध्ये ग्राहकांची संख्या वाढून चार कोटी पाच लाख झाली आहे. गेल्या वर्षी ग्राहकांची संख्या तीन कोटी 33 लाख होती.
पीएफआरडीएच्या मते, 31 जानेवारी 2021 पर्यंत व्यवस्थापनाखाली एकूण पेन्शन मालमत्ता (AUAM) 5.56 लाख कोटी रुपयेहोती. गेल्या वर्षांत 35.94 टक्के वाढ झाली होती. अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत भागधारकांची संख्या जानेवारी 2021 मध्ये31.17 टक्क्यांनी वाढून दोन कोटी 65 लाख झाली. एका वर्षापूर्वी ही संख्या दोन कोटी दोन लाख होती. जानेवारी 2021 मध्येएनपीएस अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचा-यांची संख्या 3.74 टक्क्यांनी वाढून 21. 61 लाख झाली तर राज्य सरकारच्या कर्मचा-यांची संख्या 7..44 टक्क्यांनी वाढून 50.43 लाखांवर गेली. एनपीएस अंतर्गत सर्व नागरी विभागातील भागधारकांची संख्या 31.72 टक्क्यांनी वाढून 14.95 लाखांवर गेली आहे, तर कॉर्पोरेट क्षेत्रात ती 17.71 टक्क्यांनी वाढून 10.90 लाखांवर गेली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पीएफआरडीएनेनुकतीच नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत व्हिडिओआधारित ग्राहक ओळख प्रक्रिया (व्हिडिओ केवायसी) ला खाती उघडण्यास, पैसेकाढण्यास आणि खाती बंद करण्यास परवानगी दिली आहे. अटल पेन्शन योजना हजार रुपयांना उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा एक तेपाच हजार रुपयेपेन्शन मिळते. 18 वर्षते40 वर्षांपर्यंतची व्यक्ती त्यात गुंतवणूक करू शकते. जर एखाद्या व्यक्तीनेही योजना घेतली तर त्याला कमीतकमी 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत सामील होण्यासाठी बचत बँक खाते, आधार व सक्रिय मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन घेण्यासाठी ग्राहकांना दरमहा 42 ते 210 रुपये गुंतवावे लागतील.

 

Back to top button