मराठी

अक्षयच्या मानधनाचे वाढते आकडे

मुंबई/दि.२५ – बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या मानधनाची नेहमीच चर्चा होत असते. नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री कोट्यवधी रुपयांचं मानधान घेतात. सध्या अक्षय कुमार हा सर्वात व्यस्त अभिनेता असून त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. अक्षयकुमार आणि निर्माते-दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यात तीन चित्रपटांसाठी करार झाला असून अक्षयला या तीन चित्रपटांचं मिळून 127 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. ‘अतरंगी रे’ सह ‘रक्षाबंधन’ आणि नाव न ठरलेल्या एका चित्रपटात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे. अक्षयकुमार आणि आनंद एल राय यांच्यातल्या कराराबाबत गेल्या वर्षापासूनच चर्चा होती. एकट्या ‘अतरंगी रे’साठी अक्षयकुमारला 120 कोटी रुपये मानधन मिळाल्याचंबोललंजात होतं. मात्र प्रत्यक्षात अक्षयनेतीन चित्रपटांसाठी एवढंमानधन घेतल्याचंआता स्पष्ट झालंआहे. ‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षाबंधन’ या दोन चित्रपटांचंदिग्दर्शन आनंद एल राय करणार असून तिसर्‍या चित्रपटाची जबाबदारी दुसर्‍या दिग्दर्शकाला सोपवण्यात येणार आहे. 15 मार्चपासून ‘अतरंगी रे’च्या दुसर्‍या टप्प्यातल्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. या टप्प्यात गाण्याचंचित्रिकरण होणार असून त्यासाठी आठ कोटी रुपये खर्चून सेट तयार केला जात आहे. ‘अतरंगी रे’ला बिहारची पार्श्वभूमी असून कथानकात उत्तर भारतातून दक्षिणेकडचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यासोबतच या चित्रपटाचंचित्रिकरण बनारसजवळील एका पुरातन हवेलीत करण्यात आलंअसून गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदाच या हवेलीत चित्रपटाचंचित्रिकरण झालंआहे.

Related Articles

Back to top button