भारत-बांगला देशात ५५ वर्षांनी रेल्वे धावणार
नवी दिल्ली/दि. ११ – भारत आणि बांगला देशात गेल्या 55 वर्षानंतर प्रथमच रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंंद्र मोदी आणि बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना 17 डिसेंबरला या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.
पश्चिम बंगालमधील हल्दीबारी ते बांगला देशातील हल्दीबारी दरम्यानचा रेल्वे मार्ग 55 वर्षानंतर 17 डिसेंबरला पुन्हा सुरू होईल. दोन्ही देशांचे पंतप्रधान या या रेल्वे सुरू करतील. उत्तर बंगाल फ्रंटियर रेल्वेच्या अधिका-याने ही माहिती दिली आहे. १९65 मध्ये, कूचबिहारमधील हल्दीबारी आणि उत्तर बांगला देशातील चिल्हती दरम्यानची रेल्वे मार्ग भारत आणि पूर्व पाकिस्तानला जोडला गेलेला मार्ग बंद झाला. एनएफआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुभानन चंदा म्हणाले, की मोदी आणि शेख हसीना 17 डिसेंबर रोजी हल्दीबारी-चिल्हती रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील. चिलहाटी ते हल्दीबारीला जाणारी मालवाहतूक रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी एनएफआरच्या कटिहार विभागांतर्गत आणली जाईल. कटिहार विभागाचे रेल्वे व्यवस्थापक रविंदरकुमार वर्मा म्हणाले, की परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी रेल्वे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अधिका-यांना कळविले आहे.
एनएफआरच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्दीबारी रेल्वे स्थानक ते आंतरराष्ट्रीय सीमेचे अंतर साडेचार किलोमीटर आहे आणि चिल्हती ते बांगला देशामधील सीमेचे अंतर सुमारे साडेसात किलोमीटर आहे. हल्दीबारी आणि चिल्हटी स्थानक जुना ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे, जो सिलीगुडी ते कोलकाता दरम्यान जातो. हा मार्ग सध्या बांगला देशातील भागात जातो. जेव्हा या मार्गावर पॅसेंजर ट्रेन सुरू होईल, तेव्हा लोक सिलीगुडीजवळील जलपाईगुडीहून कोलकाताला सात तासांत पोहोचू शकतील आणि आधीच्या प्रवासाच्या वेळेत पाच तासांची कपात होईल.