मराठी

भारत बायोटेकची लस तिस-या टप्प्यात

नवी दिल्ली/दि.२३ – कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. या लसीची चाचणीच्या तिसèया टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिस-या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया‘ ने तशी परवानगी दिली आहे. दोन ऑक्टोबरला भारत बायोटेकने तिस-या टप्प्याच्या चाचणीसाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी आता मिळाली असून स्वदेशी लस लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोव्हॅक्सीन लस निर्माण करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीला ‘आयसीएमआर‘चेही सहकार्य आहे. या कंपनीने क्लिनिकल ट्रायल संदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार तिस-या टप्प्यातील चाचणी १८ तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाèया स्वयंसेवकांवर करण्यात येईल. तिस-या टप्प्यात एकूण २८,५०० स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. देशात एकूण दहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीची चाचणी होणार आहे. मागील महिन्याच्या एका अहवालात भारत बायोटेकने आपली लस ही अत्यंत प्रभावी असून कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यास सक्षम असल्याचा दावा केला होता. प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर त्यांच्यात चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचा दावा कंपनीने केला होता. देशात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या कंपनीकडूनही लस विकसित करण्यात येत आहे. या कंपनीची लस चाचणीच्या दुस-या टप्प्यातआहे. अस्ट्रोजनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे या लसीची चाचणी ब-याच स्वयंसेवकांवर सुरू आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ब्राझील सरकारने गोपनीयतेचे कारण देत मृत्यूबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतर अस्ट्रोजनेका कंपनीला मोठा फटका बसला होता. अ्स्ट्रोजनेका कंपनीचे शेअर्स जवळपास १.७ टक्क्यांनी पडले होते.

Related Articles

Back to top button