मराठी

भ्रष्टाचारी देशात भारत पहिला !

नवी दिल्ली/दि.२६पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातही भ्रष्टाचार कमी झाला नाही. उलट, आशिया खंडातील राष्ट्रांत भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताने पहिला क्रमांक पटकावला असून ही बाब अतिशय शरमेची आहे.
भ्रष्टाचाराबाबत ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने नुकत्याच दिलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. या अहवालात भारत आशियातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार आशियाच्या अन्य देशांमध्ये कंबोडिया दुस-या आणि इंडोनेशिया तिस-या क्रमांकावर आहे. सुमारे 39 टक्के भारतीयांचे मत आहे, की त्यांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी कधी ना कधी लाच दिली आहे. कंबोडियात हे प्रमाण 37 आणि इंडोनेशियात 30 टक्के आहे. 2019 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भारत जगातील 198 देशांमध्ये 80 व्या स्थानावर होता. चीनही 80 व्या, म्यानमार 130 व्या, पाकिस्तान 120 व्या, नेपाळ 113 व्या, भूतान 25 व्या, बांगला देश 146 व्या आणि श्रीलंका 93 व्या स्थानावर आहेत. 62 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की भविष्यात परिस्थिती सुधारेल. याउलट मालदीव आणि जपान संयुक्तपणे आशियाच्या सर्वांत प्रामाणिक देशांमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. इथल्या फक्त दोन टक्के लोकांनी कबूल केले, की त्यांना काही कामांसाठी लाच द्यावी लागेल. यानंतर, दक्षिण कोरियाची संख्या आहे, जिथे सुमारे दहा टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की त्यांना काम मिळवण्यासाठी नातेवाइकांचा अवलंब करावा लागला.
आशिया खंडातील प्रत्येक पाच व्यक्तीमागे एकाने लाच दिली आहे. या संस्थेच्या अहवालानुसार देशातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे, की लाच घेण्यात पोलिस आणि स्थानिक अधिकारी आघाडीवर आहेत. अहवालानुसार हे प्रमाण 46 टक्के आहे. 42 टक्के लोकांना आपले खासदार भ्रष्ट आहेत, असे वाटते. 41 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की लाचखोरीच्या प्रकरणात सरकारी कर्मचारी भ्रष्ट आहेत आणि 20 टक्के न्यायाधीश भ्रष्ट आहेत. 89 टक्के नागरिकांना असे वाटते, की सर्वांत मोठी समस्या सरकारी भ्रष्टाचार आहे. 39 टक्के लोकांना लाच ही मोठी समस्या वाटते. कोणत्याही गोष्टींसाठी ओळख द्यावी लागणे ही समस्या असल्याचे 46 टक्के मानतात. मतदानासाठी पैसे ही मोठी समस्या आहे, असा विश्वास असलेले 18 टक्के भारतीय आहेत. त्याच वेळी, 11 टक्के लोकांनी कबूल केले, की नोकरी मिळवण्यासाठी शारीरिक शोषण ही एक मोठी समस्या आहे.
गेल्या एका वर्षात देशात भ्रष्टाचार वाढल्याचे 47 टक्के लोक सांगतात. 27 टक्के लोकांना मात्र भारतात भ्रष्टाचार कमी झाला, असे वाटते. 23 टक्के लोकांना गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराबाबतीत काहीच बदल झालेला नाही, असे वाटते. आशियाई देशांमध्ये 23 टक्के लोक पोलिसांना सर्वात भ्रष्ट मानतात. 17 टक्के लोकांना न्यायालये सर्वात भ्रष्ट आहेत, असे वाटते.

 

Related Articles

Back to top button