मराठी

भारताची वाटचाल नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवीदिल्ली दि /७  – २१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे येतील, यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM NARENDRA MODI) यांनी केले. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकèया, कामाचे स्वरुप यामध्ये होणारया बदलांची चर्चा होते आहे. अशात कौशल्य आणि ज्ञान यावर आधारित शिक्षण धोरण असणे हे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी म्हटले. मोदी यांनी म्हटले, की आहे. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा संदर्भातल्या परिषदेला मोदी यांनी संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते. नव्या शिक्षण धोरणाचे महत्त्व या वेळी मोदी यांनी विशद केले. ते म्हणाले, की नवे शिक्षण धोरण हे स्टडिंग ऐवजी लर्निंगवर फोकस करणारे आहे. तसेच अभ्यासक्रमापेक्षाही या धोरणात आव्हानात्मक विचारांना प्राधान्य देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर विविध भाषांवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्याथ्र्याला ज्ञान कसे प्राप्त होईल, यावर नव्या शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवे शिक्षण धोरण हे देशाचे शिक्षण धोरण आहे सरकारचे नाही. ज्याप्रकारे परराष्ट्र धोरण असते. सुरक्षासंदर्भातील धोरण असते अगदी तशाच प्रकारे या शिक्षण धोरणाचे स्वरुप आहे. नव्या शिक्षण धोरणासंदर्भात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या मनात अनेक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांचे निराकरण करुन ते आखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button