वॉशिंग्टन/ दि.२३ – अमेरिकेत निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्यात शाब्दिक चकमकही वाढल्या आहेत; मात्र ट्रम्प यांनी भारताबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. ट्रम्प यांनी चीन, भारत आणि रशियावर वायू प्रदूषणाशी निगडीत योग्य पाऊले न उचलल्याचा आरोप केला आहे. अध्यक्षीय चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी भारताची हवा अस्वच्छ असल्याचे वर्णन यांनी केले. पॅरिस हवामान करारापासून मागे हटण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. नॅशविल येथील बेलमोंट विद्यापीठात झालेल्या शेवटच्या अध्यक्षीय चर्चेदरम्यान ट्रम्प म्हणाले, की चीनकडे पाहा, ते किती घाणेरडे आहे. रशियाकडे पाहा. भारताकडे पाहा. ते खूप घाणेरडे आहेत. इथली हवा खूप घाणेरडी आहे. तीन नोव्हेंबरला अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीयांनी टीका करण्यात सुरुवात केली आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना निशाणा करत जाब विचारला. अमेरिकेत झालेल्या अंतिम चर्चेत ट्रम्प यांनी खराब वातावरणाबद्दल भारतविरूद्ध वक्तव्य करताच फिल्थीचा ट्रेंड सुरू केला. ट्रम्प यांच्या भारताच्या हवेविषयीच्या विधानावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे, की हाऊडी मोदींचा निकाल आता समोर येत आहे. त्यांनी ट्विट केले, की ट्रम्प यांनी सर्वप्रथम भारतात कोरोनामुळे होणाèया मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले, आता ट्रम्प म्हणाले, की भारताची हवा घाणेरडी आहे. ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटले. हा ‘हाऊडी मोदीचा‘ चा निकाल आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे, की ट्रम्प यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत भारताच्या प्रयत्नांची आठवणही प्रियंका यांनी या वेळी करून दिली. काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीवत्सा यांनी ट्विट केले, की अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्पसाठी मोदी यांनी ३.७ कोटी खर्च केले. आता हेच मोदींची हवा घाणेरडी असल्याचे म्हणत आहे, याला मोदी उत्तर देतील?‘
निवडणुकीसाठी निर्बंधात सूट टाळेबंदीमुळे या निवडणुकीत मतदान केंद्रांवर काम करणाèया कार्यकत्र्यांची कमतरता जाणावणार आहे. ही संखा कमी झाल्यामुळे निवडणूक नियोजन करणाèयासोबतच मतदारांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. काही राज्यांत निवडणुकीसाठी सध्या घातलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचे सरकारने जाहीर केले आहे, तरीही मतदान करणे नागरिकांना अवघड जाणार आहे.