मराठी

सार्वभाैम संपत्ती गुंतवणुकीत भारत आघाडीवर

मुंबई/दि. ११ – भारत सलग दुसऱ्या वर्षी चीनला मागे टाकत जगातील सर्वांत जास्त सार्वभौम संपत्ती निधी गुंतवणूक प्राप्त करणारा देश झाला आहे. एवढेच नव्हे तर भारताने या वर्षी आतापर्यंत चीनपेक्षा तिप्पट जास्त सॉव्हरीन वेल्थ फंड गुंतवणूक केली आहे. २०१९ पासून आतायर्पंत चीनचा दबदबा राहिला होता.
४०० हून अधिक सॉव्हरीन वेल्थ फंडाची निगराणी करणारी संस्था ग्लोबल एसडब्ल्यूएफच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत सॉव्हरीन फंड्समध्ये भारतात विक्रमी १४.८ अब्ज डॉलर(१.१० लाख कोटी रु.) भांडवल गुंतवले आहे. हे चीनमध्ये गुंतवणूक केलेल्या ४.५ अब्ज डॉलरच्या(३३.३ हजार कोटी रु.) भांडवलापेक्षा तिपटीहून जास्त आहे. असे असले तरी सॉव्हरीन वेल्थ फंड गुंतवणूक प्रकरणात भारताने चीनला गेल्या वर्षी मागे टाकले होते, तेव्हा भारतात जवळपास ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती आणि चीनमध्ये ४७.३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. या वर्षी भारताने गुंतवणुकीत बरेच मोठे बदल केले आहे. दुसरीकडे, २०१५ ते २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास चीनला भारतापेक्षा जवळपास दुप्पट जास्त गुंतवणूक मिळत होती. विश्लेषकांनुसार, अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धातून तयार झालेल्या व्यापार तणावामुळे चीन आपले स्थान गमावत आहे.
दुसरीकडे, आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंधही त्याला अधिक चांगली गुंतवणूक करण्यास मदत करत आहेत. आखाती देशांचा सॉव्हरीन वेल्थ फंड या वेळी सर्वांत जास्त गुंतवणूक करत आहे. अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी(एडीआयए), पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड(PIF), मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनी, कुवेत इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी आणि इन्व्हेस्टमेंट कॉर्पाेरेशन ऑफ दुबई आणि कतार इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीने मिळून या वर्षी भारतात ७.३८ अब्ज डॉलरची(५४,६१२ कोटी रु.) खासगी इक्विटी गुंतवणूक केली आहे. ही भारतात आलेल्या एकूण इक्विटी गुंतवणुकीच्या २० टक्के आहे. २०१९ मध्ये त्यांनी भारतात केवळ ९८ कोटी डॉलरची (७२५२ कोटी रुपये) गुंतवणूक केली होती.

Related Articles

Back to top button