मराठी

नाणेनिधीच्या अर्थतज्ज्ञांकडून भारताचे कौतुक

कोरोना लस डिप्लोमसी यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब

न्यूयार्क/दि.9 – कोरोना संकटाच्या काळात भारताने जगासमोर मानवतेचेउदाहरण घालून दिले आहे. कोरोनाशी सामना करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे जगभरात कौतुक होत आहे. अलीकडेच एका ज्येष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञाने असे म्हटले होते, की जर भारतानेही लस जगातील देशांना दिली नसती, तर कोरोनाविरुद्धची लढाईजिंकणे अवघड झालेअसते. दरम्यान, आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनीही भारताच्या कोरोना लस धोरणाचेकौतुक केलेआहे.
गोपीनाथ यांनी म्हटलेआहे, की कोरोना विषाणूच्या साथीच्या विरूद्ध लढा देण्यात भारतानेअग्रणी भूमिका बजावली आहेआणि लस धोरणाच्या बाबतीत एक वेगळे उदाहरण ठेवले आहे. गोपीनाथ यांनी भारताच्या लसीचे जलद उत्पादन आणि अनेक देशांना पुरविण्याच्या मोहिमेचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित डॉ. हंसल मेहता व्याख्यानमाले दरम्यान गीता गोपीनाथ यांनी संवाद सत्रात ही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की जगात लस केंद्र कुठे आहे, असे जर तुम्ही विचारले तर ते नक्कीच भारत असेल. अ सीरम इन्स्टिट्यूटचे कौतुक करताना गीता गोपीनाथ म्हणाल्या, की दरवर्षी जगभरात सर्वाधिक सीरममध्येलसी तयार केल्या जात आहेत आणि आता कोरोना लसीची निर्मिती तिथेवेगानेहोत आहे. या माध्यमातून गरीब देशांना लसी देण्याच्या कार्यक्रमासाठी कोव्हॅक्सिन मदत मदत मिळत आहे.
कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यात भारत अग्रणी भूमिका निभावत आहे. अनुदान म्हणून भारत अनेक शेजारच्या देशांना कोरोना लस पुरवतो. यात नेपाळ, बांगला देश, म्यानमारचा समावेश आहे. काही देशांना व्यावसायिक पुरवठादेखील करण्यात आला आहे. लसीकरणाद्वारे कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार गोपीनाथ यांनी काढले.

Related Articles

Back to top button