मराठी

कोरोना संक्रमित देशांच्या यादीत भारत 15 वा

नवी दिल्ली/दि. २२ – कोरोनाविषयी काळजी वाढवणारे वृत्त आहे. देश पुन्हा एकदा जगातील टॉप 15 देशांच्या यादीत सामिल झाला आहे. या 15 देशांमध्ये कोरोनाची सर्वांत जास्त प्रकरणेआहेत. म्हणजेच असेरुग्ण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
भारत या यादीमध्ये15 व्या क्रमांकावर आला आहे. 30 जानेवारीला पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि आयर्लंडला मागेटाकत भारत 17 व्या नंबरवर पोहोचला होता. तेव्हा आशा होती की, लवकरच जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या यादीमधून बाहेर पडूशकतो; मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. यामुळेभारत आता पुन्हा जगातील सर्वात संक्रमित देशांमध्येसामील झाला आहे.
अ‍ॅक्टव्ह प्रकरणांमध्येअमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सध्या 92 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. फ्रान्समध्ये32 लाख आणि ब्रिटनमध्ये16 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या व्यतिरिक्तया यादीमध्येब्राझील, बेल्जियम, स्पेन, इटली, रशिया, मॅक्सिको, पोलँड, आयर्लंड, इडोनेशिया, अर्जेटिना आणि भारताचाही समावेश आहे. शनिवारी देशात 13 हजार 919 नवीन रुग्ण आढळले. 11 हजार 412 लोक बरे झाले आहेत आणि 89 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारेओव्हरऑल अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्येदोन हजार 486 ची वाढ झाली आहे. नऊ राज्येआणि केंद्रशासित राज्य असेआहेत, जेथेबरेहोणार्‍या रुग्णांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, पुद्दूचेरी, त्रिपुरा आणि चंदीगडचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button