भारत पाकिस्तानला पुरवणार कोरोना लस
मुंबई/दि १० – भारत लवकरच कोरोनाव्हायरसची मेड-इन-इंडिया लस पाकिस्तानला पुरवणार आहे. जागतिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला ही लस मिळेल. तथापि, अद्याप लसीचेकिती डोस पुरवायचेहेठरलेले नाही. रसद आणि मान्यता मिळाल्यानंतर आणखी काही वेळ लागू शकेल; परंतु हे डोस थेट पाकिस्तानात पाठविलेजातील. पाकिस्तानच्या ड्रग रेग्युलेटरी थॉरिटी ऑफ पाकिस्तान या औषधाच्या नियामक कंपनीनेऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका कोरोना लसीला या वर्षी जानेवारीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. तिथेमंजूर केलेली ही पहिली कोरोना लस होती. कोवॅक्सिन या तीन प्रकारांतर्गत कमीतकमी 65 देशांना अनुदान आणि व्यावसायिक विक्री या तत्त्वावर पुरवली जात आहे. परराष्ट्रमंत्रालयाच्या नोंदीनुसार, एकूण पाच कोटी 79 लाख 19 हजार लाख डोस पुरविलेगेलेआहेत. त्यापैकी जवळपास एक कोटी 33 लाख डोस अनुदानावर तीन कोटी 38 लाख डोस व्यावसायिक तत्वावर पुरवण्यात आलेआहेत. बांगला देशात सर्वाधिक 90 लाख डोस पुरवलेआहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्येजागतिक आरोग्य संघटनेनेकोरोनाच्या साथीचेनियंत्रण आणि उपाययोजनांसाठी एका गटाची स्थापना केली होती. पाकिस्तानसह सुमारे190 देशांतील 20 टक्के लोकांना मोफत लस देण्याची योजना आहे. गेल्या काही महिन्यांत भारतातील लस उत्पादकांपैकी एकानेपाकिस्तान सरकारशी लस पुरवण्यासाठी चर्चाकेली आहे.