मराठी

भारत तिसरी आर्थिक महासत्ता होणार

नवी दिल्ली/दि.१० – जपानला मागे टाकत २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगभरातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताआधी पहिल्या स्थानावर अमेरिका आणि दुसरया स्थानावर चीन असेल. लॅसेंटच्या एका अभ्यासानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जर्नलमध्ये जगभरातील देशांमध्ये विविध स्तरांवर काम करणारया लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला. २०१७ मध्ये भारत जगभरातील सातवी मोठी अर्थव्यवस्था होता. त्याच्याच आधारे या अभ्यासात असे म्हटले आहे, की २०३० पर्यंत भारताला चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्यात यश मिळेल. भारताआधी अमेरिका, चीन आणि जपान या राष्ट्रांची नावे आहेत. सध्या भारत जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. केंद्र सरकारचा अंदाजदेखील काहीसा असाच आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी याच वर्षी मे महिन्यात असे सांगितले होते, की २०४७ पर्यंत भारत जगभरातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल; मात्र जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशावेळी करण्यात आलेल्या या अंदाजांबाबत खूपच कमी आशावाद पाहायला मिळतो आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जपानच्या ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक रिसर्च‘ ने त्यांच्या एका संशोधनात असे म्हटले होते, की २०२९ पर्यंत जपानला मागे टाकत भारत जगभरातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. जपानच्या या संस्थेने हे अनुमान कोरोना विषाणूचा उद्रेक होण्याआधी केले होते; मात्र सध्याची देशातील परिस्थिती पाहता भारत २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता धुसर झाली आहे. लॅन्सेटच्या अहवालातदेखील असा इशारा देण्यात आला आहे, की चीन आणि भारतमध्ये काम करण्याèया लोकांची संख्या कमी झाली आहे. या दरम्यान नायजेरियामध्ये काम करणारी संख्या वाढेल. असे असले तरी आकडेवारीनुसार भारतामध्ये काम करणारी लोकसंख्या अव्वल असेल.

Related Articles

Back to top button