लोकप्रिय होत आहेत भारतीय अॅप्स
मुंबई/दि.२ – सरकारनेचीनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून बरीच भारतीय अॅप्स उपलब्ध करून देण्यात आली. आता ‘कू’ हे अॅप ट्विटरला पर्याय ठरत आहे. जवळपास 45 लाख लोकांनी कूडाउनलोड केलंअसून त्याचा वापरही सुरू झाला आहे. या वर्षात वापरकर्त्यांचा आकडा दहा कोटींपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट कूनेसमोर ठेवलं आहे. अर्थात कू प्रमाणेच इतरही अनेक भारतीय अॅप्सचा वापर वाढल्याचंदिसून येत आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर चिंगारी, मित्रों, शेअरचॅट यासार‘या अॅप्सचा वापर चांगलाच वाढला. शेअरचॅटची लोकप्रियता बघता ट्विटरने हे अॅप खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. शेअर इट तसंच जेंडर यासार‘या डाटा शेअरिंग अॅप्सवर बंदी घातल्यानंतर जियोस्वीचचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. टाळेबंदीच्या काळात लूडोकिंग या भारतीय अॅपला तुफान प्रतिसाद मिळाला. चीनी गेमिंग अॅप्सवरील बंदीचा लाभ लूडोकिंगला मिळाला आहे. यासोबतच स्टेप सेट गोया फिटनेस अॅपलाही चांगला प्रतिसाद मिळत असून 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हेअॅप डाउनलोड केलंआहे.