मराठी

नासाचे रोव्हर मंगळावर उतरवण्याचा भारतीयांनाही अभिमान

पथकात स्वाती मोहनचा समावेश

न्यूयार्क/दि. २० – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचेअत्याधुनिक रोव्हर पर्सिवरेन्स गुरुवारी रात्री मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले. अमेरिकेच्या या यशाचा भारतीयांनादेखील अभिमान आहे. कारण, रोव्हर यशस्वीरित्या लँड करून टचडाउन कन्फर्महोईपर्यंत त्याची सर्वात पहिली माहिती देणार्‍या फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन भारतीय वंशाच्या आहेत. भारतीय संस्कारांची यात खूप महत्वाची भूमिका आहे. माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वात मोठी शिकवण आहे, असेस्वाती सांगतात.
पर्सिवरेन्सच्या प्रत्येक पावलाची घोषणा करणार्‍या स्वाती नासामध्येगाइडेन्स, नेव्हीगेशन आणि कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती वर्षभराच्या होत्या, तेव्हाच त्यांचे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, मी इतकी एकाग्रहोऊन काम करत होतेकी मला काहीच सूचत नव्हते. माझ्या सभोवताली काय होत आहे, हे मला कळत नव्हते. मी माझे कार्यपूर्णकरण्यातच इतके मश्गूल होते, की मला उभेहोऊन आपला आनंददेखील व्यक्त करता आलेला नाही. पर्सिवरेन्सचेलँडिंग यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी आम्ही खूप वेळ दिला. खूप नियोजन केलेहोते. त्यामध्येकाही अनपेक्षित घडल्यास दृश्यांना पाहून त्याचा अंदाज लावणेसुद्धा या नियोजनाचा भाग होता. मी सर्वंच योजनांची एक शीट तयार केली होती. माझ्या मॉनिटरच्या खाली फ्लोचार्ट ठेवण्यात आला होता. लँडिंग नियोजनाप्रमाणेनाही झाल्यास काय करावेआणि काय बोलावेहे सर्वत्यावर लिहिलेहोते. आम्ही अशा परिस्थितीतून गेलोआहोत. लँडिंग होताच भूतकाळ झालेल्या चुका विसरून गेलो.
स्वाती मोहन म्हणाल्या, की मी झोप घेण्याचा खूप प्रयत्न केला; पण पहाटेसाडेचार वाजता जाग आली. लँडिंगची तयारी करताना लवकरात लवकर कसेउठता येईल याचादेखील सराव करत होते. यश सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही रात्री पार्टी केली. मला जगभरातून फोन आले. आपली जिद्द पूर्णकरण्यासाठी त्यावर ठाम राहा. कुठलाही एक अनुभव किंवा एक यश तुम्हाला खूप यशस्वी किंवा पराभूत करू शकत नाही. यश असो की अपयश; त्या अनुभवातून तुम्ही काय आणि कसेशिकलात हे सर्वांत महत्वाचे असते. हेअनुभव तुम्हाला पुढेजाण्यास मदत करतात.

Back to top button