मराठी

मानवी निर्देशांकात भारताची घसरण

नवी दिल्ली/दि. १७ – यावर्षी ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) मध्ये भारत दोन स्थानांनी घसरला आहे. एचडीआयमध्ये या वर्षी १8१ देशांच्या यादीत भारताचे स्थान १३१ वे आहे. गेल्या वर्षी भारत १२9 व्या स्थानावर होता.
या यादीमध्ये पाकिस्तानचा 154 वा क्रमांक आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने (यूएनडीपी) जाहीर केलेल्या या निर्देशांकात नॉर्वेचा पहिला क्रमांक आहे. तर आयर्लंड व स्वित्झर्लंड अनुक्रमे दुस-या  आणि तिस-या क्रमांकावर आहेत. अहवालानुसार, भारताची एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीएनआय) दरडोई क्रय शक्ती समानता (पीपीपी) 2018 मधील सहा हजार 829  डॉलरवरून घसरून २०१९ मध्ये सहा हजार 681 डॉलरवर आली आहे. २०२० च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये भारतीयांचे सरासरी आयुर्मान 69.7  होते, तर भारतापेक्षा शेजारच्या बांगला  देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान 72. ६ आणि पाकिस्तानातील नागरिकांचे  67. 3 होते.
या अहवालानुसार भूतान आणि श्रीलंकासारखे देशही या निर्देशांकात भारतापेक्षा चांगले आहेत. श्रीलंका 72 व्या आणि भूतान 129 व्या स्थानावर आहे. भारत, भूतान, बांगला देश (१33), नेपाळ (१2२) आणि पाकिस्तान (१44) यांचे मध्यम मानवी विकास असलेल्या देशांमध्ये स्थान आहे, असे अहवालात नमूद केले आहे. या निर्देशांकात चीनचा 85 वा क्रमांक आहे. 2019 मध्ये भारताचे एचडीआय मूल्य ०.645 आहे, जे देशाला मध्यम मानवी विकास प्रकारात स्थान देते. अहवालात म्हटले आहे की 1990 ते 2019 दरम्यान भारताचे एचडीआय मूल्य 0.429 वरून 0.645 पर्यंत वाढले आहे. 1990  ते २०१९ दरम्यान भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीएनआय) दरडोई सुमारे २73.9 टक्क्यांनी  वाढले.
मानवी विकास निर्देशांक किंवा मानव विकास निर्देशांक दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षण आणि उत्पन्नाच्या निर्देशांकातून प्राप्त केलेले मानक आहे. अर्थशास्त्रज्ञ महबूब-उल-हक यांनी ही पद्धत तयार केली होती. 1990 मध्ये पहिला मानव विकास निर्देशांक प्रसिद्ध झाला. तेव्हापासून तो दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) द्वारा प्रकाशित केला जातो.

Related Articles

Back to top button