भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती अपेक्षेपेक्षा जास्त वेगवान
मुंबई/दि.२६ – कोरोना विषाणूच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेची अधोगती झाली. त्यातून आता भारतीय अर्थव्यवस्था सुधारते आहे. भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा वेगवान झाली आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर मागणीतील स्थिरतेवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
दास म्हणाले, की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 23.9 टक्के घट झाली आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक चलनवलन विस्कळीत झाले. रिझर्व्ह बँकेचा असा अंदाज आहे, की चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर -9.5 टक्के असेल. टाळेबंदीवरील निर्बंध उघडल्यामुळे आणि विशेषत: उत्सवाच्या हंगामात अर्थव्यवस्थेत चांगली पुनर्प्राप्ती झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची घट झाली असून दुस-या तिमाहीत आर्थिक व्यवहार सामान्य झाले. भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत पुनर्प्राप्ती दर्शविली आहे.
विकासाच्या दृष्टिकोनात सुधारणा झाली असली, तरी युरोप आणि भारतातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूच्या बाधितांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यात मोठे अडथळे येऊ शकतात, असे निदर्सनास आणून दास म्हणाले, की सणानंतर मागणीची स्थिरता कायम राहिली पाहिजे तसेच आणि लसीची उपलब्धता झाली, तर बाजारपेठेतील अपेक्षांचे संभाव्य पुनर्मूल्यांकन होईल. रिझर्व्ह बँक वित्तीय बाजाराचे कामकाज राखण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही कोणताही नकारात्मक धोका कमी करण्यासाठी कार्य करू