मराठी

विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलतीचे संकेत

लायब्ररी, जीम, कॅम्पस ची फी माफ करावी

पुणे/दि.१३ – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जातो आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीचे अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे. महाविद्यालयांतील लायब्ररी, जीम, कॅम्पस मेंटेनेंस यासाठी आकारण्यात येणारी फी माफ करावी, असा सूर विद्यार्थी आणि पालकांचा आहे. यासंदर्भात बोलताना फीबाबत विद्याथ्र्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याचे संकेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, की फीच्या संदर्भातील विद्याथ्र्यांचे आणि पालकांचे म्हणणे मलाही पटते आहे. त्यासंदर्भात कसा निर्णय घ्यायचा, याची चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना अपेक्षित असलेला निर्णय विभागाकडून घेतला जाईल. पुण्यातील एलएलबीच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्र्यांनी फीमध्ये ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. मागच्या सत्रात फक्त दहा दिवस कॉलेज झाले आणि टाळेबंदी लागू झाली. आताच्या सत्रात सगळे विद्यार्थी घरी आहेत. काही कॉलेजचे तर ऑनलाईन क्लासेसही सुरु झालेले नाहीत, असे या विद्याथ्र्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कॉलेजने फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीची फी माफ करावी, अशी मागणी या विद्याथ्र्यांनी केली होती.

खासगी शाळांकडे पालकही हीच मागणी करत आहेत. शाळांनी फक्त ट्युशन फी घ्यावी अशी पालकांची मागणी आहे. ज्या विद्याथ्र्यांनी पूर्ण फी भरली नाही, त्या विद्याथ्र्यांचे आनलाईन शिक्षण बंद केल्याच्या तक्रारीही येत आहेत. सामंत यांनी महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी फीबाबतीमध्ये दिलासा देण्याचे संकेत जरी दिले असले तरीही असा ठोस निर्णय कधी होतो, याची विद्याथ्र्यांना प्रतीक्षा आहे.

Back to top button