मराठी

धनगर समाज आरक्षणासाठी काढला पायदळ मार्च

येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

  • मुख्यमंत्र्यांसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन

अमरावती दी २८ : महाराष्ट्रातील धनगर जमातीस  अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, धनगर जमातीस विविध शासकीय योजनांचा लाभ सुरू करावा, मेंढपाळांवर होणार्‍या हल्ल्यापासून संरक्षण मिळण्याकरिता कठोर कायदे करण्यात यावे,  ही मागणी घेऊन धनगर आरक्षण महासंघाचे नेते अ‍ॅड. दिलीप एडतकर यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरी ते विभागीय आयुक्त कार्यालय पायदळ मार्च काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार, धनगरांना आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. शासन मात्र याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्यामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासनू वंचित आहे.  मुळात अनुसूचित जमातीमध्ये असतानासुध्दा शासनस्तरावरील सवलत लागू केल्या जात नसल्याने धनगर समाज सतत आंदोलने, उपोषण, चक्‍काजाम करीत आहेत.  70 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे.
धनगर जमातीसाठी केलेली 1 हजार कोटींची तरतूद धनगर समाजाच्या विविध योजनांवर खर्च करण्याकरिता शासनस्तरावर त्वरित कृती करावी. धनगर, मेंढपाळ रानावनात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. मेंढपाळांवर होणार्‍या जीवघेण्या हल्ल्यांपासून संरक्षण देण्याकरिता हल्लेखोरांवर कारवाई करण्याकरिता कठोर कायदे करण्यात यावे, या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी,  अन्यथा कोरोनाच्या गंभीर काळातसुध्दा तीव्र्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर आरक्षण महासंघाने निवेदनातून दिला आहे.
पायदळ मार्चमध्ये धनगर आरक्षण महासंघाचे नेते  अ‍ॅड. दिलीप एडतकर,  उमेश घुरडे, बाळासाहेब कोरोटे, रमेशपंत ढवळे, रमेश मातकर, डॉ. जयप्रकाश बनकर, अशोक इसळ, संजय ढोले, श्रीकृष्ण पाठक, डॉ. सुधाकर काळमेघ, सुनील वाघ, मनोज कचरे, श्रीकृ ष्ण गावनेर, राजाभाऊ म्हस्के, काशीनाथ फुटाणे, पुरुषोत्‍तम घुरडे, निखिल साव, निखिल देठे, सुभाष गोहत्रे, स्वप्निल साव, राजेंद्र म्हस्के, अशोक लव्हाळे, ऋषिकेश काळेकर, प्रतिक गावनेर, भीमराव चारथळ, जानराव घटारे, सुरेंद्र लोथे, प्रफुल्ल डहाके, नंदा चापके, साधना म्हस्के, संगिता साव, प्रतिभा उमेकर, दमयंती उमेकर, छबुताई मातकर, जयश्री वाघ, शारदा ढोमणे,माजी नगरसेविका प्रतिभा इसळ, अहिल्या महिला परिषदेच्या अध्यक्षा वंदना गायनर, अवकाश बोरसे, सतीश तिडके, प्रमोद तालन, डॉ. सुशीर दर्यापूर वासुदेव पाठक, संतोष विठ्ठलराव महात्मे, रामभाऊ मुंदाणे, सचिन कोल्हे, श्रीकृष्ण ढोमणे, विनिता गादे, वंदना एडतकर, जयश्री शहाकार, प्रणीता कोल्हे, वैशाली लादे, मेघा बोबडे, नियती एडतकर, प्रीती एडतकर, राजेश म्हस्के, बापुराव तालन, निलेश गाढेकर, लक्ष्मण खाडे, उत्तम अवघड, सचिन शहाकार, अक्षय एडतकर, रमेशराव पाटेकर, रवीभाऊ कोकरे, ज्योतीराम कोरटकर, मनोज करडे, प्रमोद तालन, संदीप सुशीक, ओमभूषण, ज्ञानेश्‍वर घुरडे, दीपक चिंचे, अनिकेत लामसे, अ‍ॅड. विश्‍वास काळे, प्रशांत गोंडसे, रामराव घोडस्कर, राजेश आगरकर, अ‍ॅड. सतीश लांडे, अजय साव, संतोष साव, श्री. चारथळ, बापूराव तालन यांच्यासह बहुसंख्य धनगर समाजबांधव उपस्थित होते

Related Articles

Back to top button