मराठी

महागाईमुळे पतधोरणात बदल नाही

मुंबई दि ४ – महागाई लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने पतधोरणात कोणताही बदल  केलेला नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तीन समितीच्या बैठकीनंतर सांगितले, की  महागाई अजूनही उच्च पातळीवर राहील, याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हिवाळ्यात यामध्ये थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
ते म्हणाले, की महागाईचा दर उंच असल्यामुळे पुरवठा साखळीत अडचण आहे. रेपो दरात कोणताही बदल होणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांनी पूर्वी व्यक्त केला होता. निकालानंतर रेपो दर 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के  कैश रिजर्व्ह रेशियो तीन टक्के आणि बँक दर 4.25 टक्के राहील. आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिस-या तिमाहीत किरकोळ महागाई 6.8 टक्के, चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के  राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्हह बँकेने आधीच्या ऑक्टोबरच्या पतधोरणामध्ये असा अंदाज व्यक्त केला होता, की 2020-21 मध्ये देशातील जीडीपी 9.5 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. तिसऱ्या तिमाहीत ते 5.6 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज होता. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत जीडीपीमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ होण्याचा अंदाज होता.
तिस-या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांकानुसार महागाई दर 6.8 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. वास्तविक जीडीपी वाढ 2021 मध्ये -7.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दास म्हणाले, की आर्थिक बाजारपेठ चांगली कामगिरी करत आहे. गावांमध्ये मागणींत चांगली  वाढ होत आहे. हे भविष्यातही सुरूच राहील. सिस्टममध्ये तरलता टिकवण्यासाठी आपण योग्य वेळी सर्व साधनांचा वापर करू. कॉर्पोरेट उत्पन्न दर्शवित आहे, की मागणी सुधारत आहे आणि नफ्याच्या आकडेवारीत वाढ होत आहे. शहरी मागणीत आणखी वाढ झाल्याने ग्रामीण भागातील मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्राची स्थिरता राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट सिक्युरिटी कंट्रोलसाठी सूचना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवेच्या अडचणी समोर आल्या. एचडीएफसी बँकेला कोणतीही नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास मनाई आहे. त्याच वेळी काल एसबीआयची योनो डिजिटल सेवा ठप्प झाली. तक्रारी हाताळण्यास दिरंगाई झाल्यास ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. प्रस्तावित डिजिटल पेमेंट सुरक्षा नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे लवकरच सार्वजनिक केली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button