मराठी

संत्रा फळगळीबाबत पाहणी अहवाल तत्काळ सादर करावेत

जिल्हाधिकारी शैलेश नवाल ने दिले निर्देश

अमरावती, दि. १० : जिल्ह्यातील संत्रा फळगळीबाबत कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीचे अहवाल तत्काळ सादर करावेत व इतर पीकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज संत्रा फळगळ, उदीड-मूग पीक नुकसानीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी व विविध उपविभागीय अधिका-यांकडून घेतली, तसेच कामाला गती देण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात संत्रा फळगळीबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. मोर्शी, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार व इतर तालुक्यात विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली आहे, अशी माहिती श्री. चवाळे यांनी दिली. संबंधित पाहणीचे अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
अतिवृष्टीने झालेल्या उडीद, मूग आदी पीकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

Back to top button