मराठी
पी.आर.कार्ड सर्वेक्षण व वितरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची सूचना
आ. सुलभाताई खोडके यांनी घेतला आढावा
अमरावती/दि.३ – अमरावती विधानसभा मतदार संघातील झोपडपट्टी व इतर विभागात पी.आर. कार्डबाबत ब-याच तक्रारी आहेत. सदर विभागातील तक्रारीबाबत दोन-तिन विभागांमध्येव समन्वय साधणे आवश्य्क आहे. त्याा अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्याबकरीता सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर,2020 रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 2.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पी.आर. कार्ड या विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या पी.आर. कार्डची समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश आ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी संबंधितांना दिले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घटक क्रमांक चार मधील घरकुलासाठी लाभार्थ्यांना पी . आर . कार्ड नसल्याने अडचणी येत होत्या .शहरातील घोषित झोपडपट्यामध्ये पी. आर. कार्डचा सर्वे होऊनही पी आर कार्ड वितरित न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना पीएम आवास योजनेची प्रतीक्षा लागली होती . याबाबत अनेक लाभार्थींद्वारे आ. सुलभाताई खोडके यांच्यापुढे आपल्या समस्या कथन करून पी आर कार्ड चे वितरण करण्याची मागणी करण्यात आली . मागणीच्या अनुषंगाने आ. सुलभाताई खोडके यांनी संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली . पी आर कार्ड संदर्भात ज्या अडचणी येत आहे , त्या दुर करुन सदर योजना गतीमान करुन लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या योजने संदर्भात अडचणी येत असल्यास त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. पी.आर.कार्ड देतांना लागणा-या नाहरकत प्रमाणपत्राच्या संदर्भात येणा-या अडचणी मार्गी लावण्यायसाठी संबंधीत विभागासोबत बैठक आयोजित करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. भुखंडाचा प्रश्ना मार्गी लागणे गरजेचे आहे. पी.आर. कार्ड बाबत अनेक नागरिक वंचित आहे, लाभार्थीना पी.आर.कार्ड देणे गरजेचे आहे. पी.आर. कार्डसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे असल्यााशिवाय प्रक्रियेला सुरुवात करता येणार नाही तसेच पी.आर. कार्ड मिळू शकणार नाही. शहरातील काही भागात येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसात किंवा दिवाळी नंतर पी.आर. कार्ड वाटपाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसानंतर पुन्हा पी आर कार्ड संदर्भात मनपा आयुक्त प्रशांत रोडे ,उपअधिक्षक भुमिअभिलेख अनिल फुलझेले, उपविभागीय अधिकारी , महसूल उपजिल्हाधिकारी , तहसीलदार , पीएम आवास योजनेचे उप अभियंता सुनिल चौधरी, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल , असे या बैठकीत ठरले. पी.आर. कार्ड संदर्भात काही तक्रार असल्यास त्या लेखी स्वरूपात मागविण्यात येणार असून , केवळ अधिकाऱ्यासोबत होणाऱ्या आगामी बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सूतोवाच आ . सुलभाताई खोडके यांनी केले . पी.आर.कार्ड नागरिकांसाठी फार महत्वाचे असून प्रत्येक विभागाने नागरिकांना सहकार्य होईल याप्रमाणे कार्य करावे. सदर कागदामुळे लाभार्थी अनेक योजनांपासून वंचित राहतो. पी.आर. कार्ड संदर्भात दर दोन महिन्याने बैठक घेवून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल. येणा-या एक वर्षात पी.आर.कार्ड संदर्भात प्रलंबित विषय पूर्णपणे मार्गी लावण्याचा मानस यावेळी आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला .
या बैठकीत मनपा आयुक्त प्रशांत रोडे,उपअधिक्षक भुमिअभिलेख अनिल फुलझेले, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष उईके, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनिल चौधरी, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर किशोर शेळके, माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक सलीम बेग, नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका मंजुश्री महल्ले, माजी नगरसेवक रतन डेंडुले, माजी नगरसेवक इमरान अशरफी, विजय बाबुळकर, प्रवीण मेश्राम, गजानन घरडे, संजय बोबडे, राजाभाऊ चौधरी, किशोर भुयार, पप्पुसेठ खत्री, अशोक हजारे, अजय दातेराव, मनिष देशमुख, सुनिल रहाटे, दिनेश देशमुख, नितीन भेटाळू, राजेंद्र लुगे, मनोजभाऊ केवले, महेंद्र भुतडा, महेश साहु, श्रीकांत झंवर, अॅड.सुनिल बोळे, दिपक कोरपे, राजाभाऊ सांगोले, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रविण भोरे, मनिष करवा, प्रशांत काळबांडे, गजानन राजगुरे, जितुभाऊ ठाकुर, सनाभाई ठेकेदार, गाझी जहरोश,सनाउल्ला सर, नदीम मुल्ला, अॅड.शोहेब, हबीबखान ठेकेदार, डॉ. आबीद, बब्बुभाई ड्रायव्हर, सै.साबीर, अफसर बेग, रफफु पत्रकार, मुन्ना नवाब, फारुख मंडप, अबरार भाई, मोईन खान, साबीर पहलवान, फहिम भाई मेकॅनिक, सादीक रजा, वहिद खान राकॉं अध्यक्ष, नाजीम सर, शारीकभाई, परवेज मालनबाजी, समीर नगरसेवक, अफजल चौधरी, हब्बुभाई, बिलालभाई, दिलबर शाह, गुड्डु हमीद, याहॉं खान पठाण, मिर्झा नईम अख्तर, फिरोज नगरसेवक, शादीक शहा नगरसेवक, खालीक भाई बर्तनवाले सर्व अधिकारी उपस्थित होते.