मराठी

अमरावती शहरातील शिक्षकांचा विमाशिला पाठिंबा

प्रकाश काळबांडेंच्या भेटीने शिक्षकांमध्ये संचारला उत्साह

अमरावती दि २३ – अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार प्रकाश काळबांडे यांनी अमरावती शहरातील शाळा-महाविद्यालयातील शिक्षक तसेच प्राध्यापकांच्या भेटी घेऊन त्यांचा पाठिंबा मिळविण्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रकाश काळबांडे यांना यश आले आहे. प्रकाश काळबांडे यांच्या भेटीमुळे शिक्षकांमध्ये देखील मोठा उत्साह संचारला आहे.
शिक्षक मतदारसंघात प्रकाश काळबांडे यांच्यासाठी मोठ्या संख्येने सध्या शिक्षक वर्ग एकवटू लागला आहे. आज अमरावती शहरातील ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अशा विविध शाळा महाविद्यालयांमध्ये प्रकाश काळबांडे यांनी भेटी दिल्या. यावेळी प्रकाश काळबांडे यांनी शिक्षक तसेच प्राध्यापक वर्गाशी संवाद साधून त्यांच्या समस्या तसेच प्रश्नांवर सखोल चर्चा केली. अमरावती विभाग एका शिक्षकालाच शिक्षक आमदार करायचे आहे आणि त्यासाठी विमाशि संघ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे शिक्षकांनी प्रकाश काळबांडे यांच्याशी बोलताना सांगितले. अमरावती शहरात शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी विमाशिसंघालाच आपला पाठिंबा असल्याचा विश्वास यावेळी बोलताना दिला. अमरावती विभागातील शिक्षकांच्या समस्या अनेक असून प्रशासन आणि शासनाचे शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्षच आहे. राजकीय पक्षांपेक्षा शिक्षकांची संघटनाच आमचे प्रश्न हिरीरीने सोडवून घेऊ शकतात त्यामुळे आम्ही विमाशिसंघासोबतच असल्याचे शिक्षकांनी यावेळी सांगितले.
प्रकाश काळबांडे यांच्या प्रचार दौऱ्याला अमरावती शहरातील शिक्षक तसेच प्राध्यापकांनी उदंड प्रतिसाद देत त्यांच्या पाठिशी राहण्याचा विश्वास दिल्याने प्रकाश काळबांडे यांची बाजू आणखी मजबूत झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील काळबांडे यांची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावेळी विमाशिचे जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तसेच नुटाचे सिनेट सदस्य भैय्यासाहेब मेटकर, विजुक्टाचे बी.एस.प्रजापती, विमाशिचे कार्यवाह अरविंद चौधरी, महानगर अध्यक्ष अतुल देशमुख, शिक्षण मंचचे डॉ.अविनाश जुमळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button