मराठी

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

अमरावती/दि २- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना ,राष्ट्रीय छात्र सेना आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले.आंतरराष्ट्रीय वेबिनार चा विषय *covid-19‌‌* *योग आणि आरोग्य* असा होता, या आंतरराष्ट्रीय वेबिनार च्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.छाया विधळे या होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ इंडिका, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका तर दुसरे वक्ते श्री स्टीव्ह योगा फेडरेशन सेशन हे उपस्थित होते. बीजभाषक माजी प्राचार्य, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथील डॉ अरुण खोडस्कर उपस्थित होते.डॉ .राजेश बुरंगे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे विशेष निमंत्रित होते.. प्रमुख वक्ते डॉ. इंडिका यांनी प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी शरीराच्या तंदुरुस्तीसाठी योगा कसा अत्यावश्यक आहे हे विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. डॉ राजेश बुरंगे संचालक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी बेबी नार घेण्यामागचा उद्देश विशद केला आणि योगा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी उत्कृष्ट जीवन शैली करता योगाचा समावेश आपल्या आयुष्यात कसा महत्त्वपूर्ण आहे यावर प्रकाश टाकला. श्री स्टिव्ह यांनी योगा हा दैनंदिन जीवनासाठी तसेच मनःशांतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे विचार आपल्या भाषणातून मांडले. तर बीजभाषक डॉ अरुण खोडस्कर यांनी योग आणि आरोग्य यावर विस्तृत मांडणी केली. कोरोनाच्या याकाळात योगा कसा महत्वपूर्ण आहे हे सुद्धा त्यांनी पटवून दिले. आंतरराष्ट्रीय बेबीनार च्या अध्यक्ष प्राचार्य डॉ छाया विधळे यांनी “योगा असे जिथे.. आरोग्य वसे तिथे”ही संकल्पना विशद केली.योग ही आपल्या संस्कृतीची अमूल्य धरोहर आहे .योगा मध्ये विविध प्रकारचा अभ्यास आणि पद्धती समाविष्ट आहेत योगासनं केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते असे विचार व्यक्त करून आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रमुख वक्ते, बीज भाषक व निमंत्रितांच्या विचारांचा वेध घेतला.. या आंतरराष्ट्रीय वेबिनार ला प्राध्यापक वृंद विद्यार्थी तसेच शिक्षकेतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेबिनार चे संचालन आंतरराष्ट्रीय बेबिनार च्या संयोजक डॉ .मंदा नांदुरकर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन शालिनी वाटाणे यांनी केले. या बेबी नारला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी यांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.

Related Articles

Back to top button