मराठी

चंद्रावर आता इंटरनेट सेवा

न्यूयार्क/ दि.२०  – चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क तयार करण्यासाठी नासाने नोकिया कंपनीची निवड केली आहे. फिनलंडच्या या कंपनीने म्हटले, की अमेरिकेची अंतराळ संस्था भविष्यात मनुष्य चंद्रावर  परत जाईल आणि वस्त्या स्थापन करेल, याची योजना आखत आहे. 2024 पर्यंत मानवाला चंद्रावर नेणे आणि तेथे त्याच्या आर्टेमिस प्रोग्राम अंतर्गत दीर्घकाळ उपस्थिती असणे हे नासाचे ध्येय आहे.
नोकियाने सांगितले, की अंतराळातील पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टम 2022 च्या उत्तरार्धात चंद्राच्या पृष्ठभागावर तयार केली जाईल. यासाठी, कंपनी टेक्सासच्या कंपनीशी भागीदारी करेल, जी नोकियाची उपकरणे चंद्रावर नेईल. चंद्रावर फोर जी  / एलटीई कम्युनिकेशन सिस्टम स्थापित करण्याची योजना आहे. त्यानंतर नोकिया या सेवेचे फाईव्ह जीमध्ये रुपांतर करील. कंपनीने म्हटले आहे, की हे नेटवर्क अंतराळवीरांना व्हॉईस आणि व्हिडिओ संप्रेषणाची सुविधा तसेच टेलीमेट्री आणि बायोमेट्रिक डेटा एक्सचेंजची सुविधा देईल आणि रोव्हर्स आणि इतर रोबोटिक उपकरणांसाठी सहकार्य करील. नेटवर्क कठीण परिस्थितीतही कार्य करेल.
नेटवर्कचे डिझाइन अशा प्रकारे केले जाईल, की ते चंद्रावर लॉन्चिंग आणि लँडिंगच्या विचित्र परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असेल. ही उपकरणे अत्यंत कॉम्पॅक्ट स्वरूपात चंद्राकडे पाठविली जातील. नोकियान स्पष्ट केले, की आम्ही गेली अनेक दशके जगभरात वापरल्या जाणा-या फाईव्ह जी नेटवर्कऐवजी 4 जी / एलटीई वापरू. या नेटवर्कने आपली विश्वसनीयता सिद्ध केली आहे. तथापि, कंपनी ‘एलटीईचे उत्तराधिकारी तंत्रज्ञान, 5 जी च्या ‘स्पेस एप्लिकेशन्स’ देखील प्रगत करेल.

Related Articles

Back to top button