![Accident-Amravati-Mandal](https://mandalnews.com/wp-content/uploads/2020/10/Accident-Amravati-Mandal-780x470.jpeg?x10455)
वरुड 1९ नोव्हेंबर – भरधाव व अनियंत्रीत बोलेरो पिकअपच्या धडकेत इसमाचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास स्थानिक विश्रामगृहानजीक घडली. या प्रकरणी वरुड पोलिसांनी मिनिट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहीतीनुसार, जरुड येथील गजानन कृष्णाजी वाळोदे नामक ६२ वर्षीय इसम वरुडहून जरुडकडे जात असतांना मुलताईकडून जरुडकडे जात असलेल्या भरधाव व अनियंत्रित पिकअप बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गजानन यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे निदर्शनास येतात रस्त्याने ये-जा करणा:यांनी आणि आजुबाजुच्या नागरिकांनी पोलिसांना अपघाताबाबत माहीती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह तातडीने ग्रामिण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहामध्ये रवाना केला.
या प्रकरणी भुषण धनराज वाळोदे यांच्या फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी एम.एच.२७ एक्स ७६४१ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप चालकाविरुध्द ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
या घटनेने जरुड गावामध्ये शोककळा पसरली आहे.