नवीदिल्ली/दि.१७ – अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे विद्ममान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने ती अवघड बनत चालली आहे. निवडणुकीच्या प्रचताराला सुरुवात झाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडने आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. भारतीय आणि अश्वेतांच्या मुद्द्यावर बायडेन आणि हॅरिस यांनी १३ लाख मतांची बेगमी केल्याचे मानले जाते. ट्रम्प हे श्वेतवर्णींयांची बाजू घेत असून त्यावरूनच आता त्यांची कोंडी होत आहे.
आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणातही बायडेन हे ट्रम्प यांच्या पुढे गेले आहेत. अमेरिकन प्रथमच्या नावाखाली ट्र्मप यांनी जो धूडगूस घातला, त्यावरून जगात ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्याचे पडसाद अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही उमटणार आहेत. एकीकडे ट्रम्प हे भारताला मित्र म्हणवतात आणि त्याचवेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बाबतीत भारतविरोधी भूमिका घेतात. अमेरिकेच्या बाबतीत इंदिरा गांधी यांनी जे भाकीत केले होते, ते मोदी यांनी लक्षात ठेवायला हवे. चीनच्या प्रश्नावरून जरी मोदी यांची ट्रम्प पाठराखण करीत असले, तरी त्यांच्या या पूर्वीच्या धरसोड भूमिका लक्षात घेता त्यांच्यांशी फार सख्य करणेही उचित नाही.