मराठी

शेतमालाला किमान हमी भाव देणे सरकारसाठी आवश्यक 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

  • ७५ रुपयांचे नाणे जारी

नवी दिल्ली/दि. १६  – देशाच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा घटक असल्याने रालोआ सरकार हमीभावात कृषी उत्पादने खरेदी करण्यास कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सांगितले. हमीभावातील खरेदी वैज्ञानिक पद्धतीने व्हावी, यासाठी बाजार पायाभूत व्यवस्थेत सुधारणा केली जात आहे. जागतिक अन्न सुरक्षेसाठी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यात आली, असे त्यांनी अन्न व कृषी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहोळ्यात ७५ रुपयांचे नाणे जारी करताना सांगितले.
देशातील धान्याच्या घाऊक बाजारपेठा किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मागील ६ वर्षांत २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटसोबत (ई-नाम) जोडणी करण्यासाठी या बाजारपेठांमध्ये माहिती व तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी तसेच शेतक:यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अलिकडेच कृषी क्षेत्रात तीन मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. यातील जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे बाजारात अधिक स्पर्धा निर्माण होईल, शेतक:यांचे उत्पन्न वाढेल आणि वाया जाणा:या खाद्यान्नाच्या समस्येला आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या काळात शेतक:यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे देशाला कुपोषणासोबत लढण्यास मदत मिळाली. धान्य उत्पादनात यंदा शेतक:यांनी मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्या प्रमाणेच गहू, तांदूळ आणि डाळींच्या सरकारी खरेदीचा विक्रमही सरकारने मोडला आहे, असे त्यांनी सांगितले.

मुलींचे लग्नाचे योग्य वय लवकरच ठरवणार

मुलींचे लग्नाचे उचित वय लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहितीही पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी दिली. मुलींचे लग्नाचे उचित वय निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

Related Articles

Back to top button