जेईई व नीट परीक्षा सध्या घडीला घेणे शक्य नाही
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी
-
कोरोनाच्या पार्शवभूमीवर परीक्षा रद्द करावीत
मुंबई/दि.२६– कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन जेईई , नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी, यासाठी राज्य सरकारच्यावतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी, अशी पत्राद्वारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
केंद्रीय स्तरावर इंजिनिअरिंग (Engineering) प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (JEE) परीक्षा तसेच वैद्यकीय शिक्षणास प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या घेणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकते. या परीक्षेमध्ये राज्यातूनही लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. परंतु सध्यस्थितीत ही परीक्षा घेणे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्यावतीने केंद्राकडे ही परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याबाबत आग्रही मागणी करावी, असे धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.याचबरोबर, येत्या 20 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (MPSC) लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. या परीक्षेची तारीख कोरोनामुळे याआधीही बदलण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे, त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.