मराठी
जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज महासमाधी द्विशताब्दी वर्ष महापारायण -द्वितीय पुष्प
अमरावती/दी.२१- सुर्जी-अंजनगाव: श्रीदेवनाथ पीठाचे आद्य पीठाधीश्वर परब्रम्ह महारुद्र जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांच्या महासमाधीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त श्रीक्षेत्र सुर्जी अंजनगाव येथील श्रीनाथ पीठात सुरु असलेल्या देवनाथ परंपरेतील श्रीनाथ गुरुचरित्र अशी ख्याती असलेल्या श्रीदेवनाथ लीलालहरी महापारायण उत्सवाचे दुसरे पुष्प श्रीनाथ महाराजांच्या चरणी अर्पण केले गेले. आजच्या द्वितीय दिनी श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी जगद्गुरू देवनाथ महाराज यांच्या महासमाधीचे आणि विग्रहाचे पूजन केले. आजच्या महापारायणात सुर्जी अंजनगावातील गणमान्य प्रभृती हरेश चटबार, बंडूभाऊ नाथे, तीर्थदास दिंडोकार, पप्पू पांडे, अशोक गौर, गजानन वाठ ,श्रीकृष्ण गोरडे, विजू काळे यांनी आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे पूजन केले. आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या प्रवचनात देवनाथ महाराजांच्या दिव्य चरित्रातील लीला प्रसंगांचे प्रासादिक वाणीत वर्णन केले. ३१ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या महापारायण महोत्सवाचे उद्या तिसरे पुष्प राहील.