-
सर्वसामान्य लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने लोकोपयोगी
अमरावती/दि.११ – महानगर पालिका अंतर्गत असलेल्या रहाटगांव परिसरात बँक पाहिजे अशी गेल्या अनेक दिवसांपासून जनता-जनार्धनाची मुख मागणी होती, त्या मागणीचा पाठपुरावा बँक संचालकांनी केला आणि आज आपण भारत सरकार मान्यताप्राप्त अमरावती जन-धन अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन देखील करत आहोत असे महापौर चेतन गावंडे म्हणाले. त्यांच्या हस्ते बँकेच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. बँक ही सर्वसामान्य लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बँक असून लोकोपयोगी कार्य जास्तीत जास्त प्रमाणात कसं करता येईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे आणि जन-धन बँक हे कार्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करेल, असा मला विश्वास वाटतो असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
यादरम्यान त्यांच्यासोबत व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बाजड, तसेच कॉंग्रसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, प्रवरा नागरी सहकारी पंतसंस्थेचे अध्यक्ष तुषार कुळकर्णी, उद्योजक नितीन कदम, पॉवर ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, एलआयसीचे अभिकर्ता विनोद तानवैस, नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण,बँकेचे अध्यक्ष धम्मवीर तंतरपाळे, उपाध्यक्ष नंदकुमार इंगळे, सचिव संदीप बाजड, संचालक सतीश वानखडे, उमेश जयस्वाल, संजय गोरुले, राजेश ठाकरे यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्रदीप बाजड म्हणाले कि, जागतिकीकरणामुळे व्यवसायावरील अनेक निर्बंध शिथिल झाले आणि नोकर्यांच्या कमतरतेमुळे अनेकजण धंदा-व्यवसायाकडे वळू लागले. सरकारकडूनही स्वयंरोजगाराच्या योजनांचा वर्षाव सुरू झाला. बँकेमधूनही कर्ज मिळू लागल्याने अनेक उद्योगधंदे वाढू लागले. लोकांच्या हातात पैसा घोळू लागला. लोक खर्च करू लागले. तसेच भविष्यातील तरतुदीचे महत्त्व कळू लागल्याने लोकांचा बचतीकडे कल वाढू लागला. घरात पैसे साठविल्यापेक्षा बँक क्षेत्रात सामान्य व्यक्तीच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम होत आहे. त्यामुळेच जनतेचा बँक क्षेत्रावरचा विश्वास दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. असे हि बोलतांना म्हणाले, त्याचबरोबर किशोर बोरकर म्हणाले कि कोरोना सारख्या दिवसात आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंग रूप बदलून टाकायचे, या विचाराने प्रभावित होऊन जनसामान्यांच्या हितासाठी जनधन बँक उघडणे हे काही सोपी गोष्ट नाही, त्यामुळे संचालक मंडळाच्या धाडसी पणाला मानाव तेवढ कमीच आहे. आता त्यांच्या धाडस वृतीला आपण हि साथ द्यायला पाहिजेचं असही ते बोलतांना म्हणाले. यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्याला विजया काळे, अमोल नानोटकर, उत्तम ब्राम्हणवाडे, डॉ.कुशल लोटे, फणींद्र वाडकर, विशाल चव्हाण,अनुप गाडगे, रवींद्र खांडेकर मोहसीन खान, जिया खान, निचत काका, निभोरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता बाजड यांनी तर प्रास्ताविक संदीप बाजड व आभार प्रदर्शन नंदकुमार इंगळे यांनी केले.