मराठी

कोरोनाबाधित मृताच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल गायब

उल्हासनगरच्या ज्या मॅक्सिलाईफ रुग्णालयाची घटना

कल्याण/दि. ७ – कोरोनाबाधित मृत रुग्णाच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरीला गेल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. उल्हासनगरच्या ज्या मॅक्सिलाईफ रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आले होते, तेथेच दागिने चोरीला गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाइक आणि मित्रांनी केला आहे. अंबरनाथच्या सूर्योदयनगर भागात राहणाऱ्या शशिबाला शर्मा यांना कोरोना संशयित म्हणून २२ जून रोजी उल्हासनगरच्या मॅक्सिलाईफ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनने त्यांना कळवले. मृतदेह सोपवल्यांतर मृताच्या अंगावर दागिने नव्हते, असे मृताच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. खात्री करण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मागितले असता ते डिलीट झाल्याचे रुग्णालयाने मृताच्या कुटुबीयांना सांगितले.

त्यामुळे हे दागिने रुग्णालयानेच चोरल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दिली; मात्र पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आणि ठाणे पोलिस आयुक्तांना यासंबंधी मेलद्वारे तक्रार केली आहे.

Back to top button