मराठी

पाकिस्तानमध्ये जिहाद विद्यापीठ

इस्लामाबाद/दि.२२ –  पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा उघडपणे प्रचार आणि प्रसार होत आहे. इथल्या मदरशांमधील मुलांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते. येथील मुलांचे ब्रेन वॉश केले जातात. पेशावरच्या पूर्वेस सुमारे साठ किलोमीटर अंतरावर अकोरा खट्टक येथे अशी एक संस्था अस्तित्वात आहे, जिला जिहाद विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. दारुल उलूम हक्कानिया मदरशाला पाकिस्तान सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष आणि धार्मिक गट यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे जिहाद विद्यापीठास उत्तेजन मिळाले आहे. या व्यतिरिक्त काही पाकिस्तानी अतिरेकी आणि आत्मघाती हल्लेखोरही या मदरशाशी संबंधित होते, ज्यामुळे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या झाली.या कथित विद्यापीठांत चार हजाराहून अधिक मुले शिक्षण घेतात, ज्यात बरेच पाकिस्तानी आणि अफगाण शरणार्थी आहेत. येथे विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व्यवस्था व भोजन दिले जाते. या महिन्याच्या सुरुवातीस, हक्कानीया मदरशाच्या नेत्यांनी तालिबानी अतिरेक्यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला होता, ज्यावर अफगाणिस्तानच्या सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांचे प्रवक्ते सादिक सिद्दीकी यांनी सांगितले, की या संस्था मूलगामी विचारांना जन्म देतात, तालिबानी निर्माण करतात. मदरशाच्या नेत्यांनी ही संस्था दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत असल्याचा इन्कार केला आहे.
विद्यार्थ्यांना येथे युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते. येथे अभ्यास करणारे कथित विद्यार्थी तालिबान आणि अन्य कट्टरपंथी संघटनांच्या निर्णयामध्ये सामील असल्याचे मानले जाते. ही एक प्रकारची जिहादी कारकीर्द बनवणारी संस्था बनली आहे. दहशतवाद प्रायोजित करण्यासाठी पाकिस्तानला शेजारच्या देशांनी अनेकदा फटकारले आहे. 2018 पासून पाकिस्तानला फायनान्शियल क्शन टास्क फोर्स (एफएटीएफ)च्या करड्या यादीतून बाहेर रडता आलेले नाही. या वेळी देखील एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे-लिस्टमध्ये कायम ठेवले आहे. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अफगाणिस्तानच्या पहिल्या दौ-यावर गेले होते. तिथे त्यांना कडाडून विरोध करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (UNSC) च्या अहवालानुसार अफगाणिस्तानात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या मोठ्या दहशतवादी संघटनेचे सुमारे साडेसात हजार पाकिस्तानी दहशतवादी कार्यरत आहेत. अलीकडील युरोपीयन थिंक टँक – युरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (IFSS) नेही एका अहवालात म्हटले आहे, की अफगाणिस्तानात हिंसाचार वाढविण्यात पाकिस्तानचा हात आहे.

 

 

Related Articles

Back to top button