मराठी

जिओ आता अ‍ॅमेझॉनला आव्हान देण्याच्या तयारीत

रिलायन्स इंडस्ट्रीज ची विविध कंपन्यां खरेदी करण्याची तयारी

मुंबई/दि. १८ – मुकेश अंबानी या आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने आपली तंत्रज्ञान कंपनी जिओ प्लॅटफॉर्मच्या विक्रीतून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भांडवल जमा केले. आता रिलायन्स इंडस्ट्रीज विविध कंपन्यांची खरेदी करण्याची तयारी करत आहे. अ‍ॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी काही स्थानिक ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांची साखळी तयार करण्याचा अंबानी यांचा प्रयत्न आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय इंधन ते किरकोळ आणि दूरसंचार उद्योगांपर्यंत विस्तारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ऑनलाईन फर्निचर विक्रेता अर्बन लेडर, झिवामे आणि औषधाशी संबंधित कंपनी नेटमेड्सची ऑनलाईन विक्री करण्याच्या विविध टप्प्यात आहे. तथापि हे सौदे कधी अंतिम होतील, याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज भारतात आपला किरकोळ व्यवसाय आणखी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटींहून अधिक असल्याने अ‍ॅमेझॉनसह अनेक स्थानिक कंपन्या देशातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अंबानी यांनी गेल्या महिन्यात रिलायन्स रिटेल लिमिटेड कंपनीची योजना सुरू केली. फेसबुक आणि गूगलसारख्या कंपन्यांना आपल्या डिजिटल कंपनीचा ३३ टक्के स्सा विकल्यानंतर त्यांनी रिलायन्स रिटेल लिमिटेडची योजना आखली. रिलायन्स बंगळूरच्या झिवामे यांना दहा लाख डॉलर्सची भरपाई करू शकते. अर्बन लेडरशी संबंधित करार ३० दशलक्ष डॉलर्सचा तर नेटमेड्सबरोबरचा व्यवहार १२० दशलक्ष डॉलर्सचा असू शकतो.

याआधी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने २०१७ च्या आसपास वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांचे अधिग्रहण सुरू केले. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज‘ने स्टोअर चेन हॅमलीज, म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सावन यासारख्या कंपन्यांचा ताबा घेतला. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज‘ने भारतीय किरकोळ विक्रेता फ्युचर ग्रुपचा बिग बझारचा व्यवसाय खरेदी करण्याच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

Related Articles

Back to top button