जीतनदेवीने महिलांना दिला नवा रोजगार
रांची/दि.८ – डाहू गावात जीतन देवी बांबूपासून अनेक आकर्षक वस्तू बनवतात. हे काम करण्यासाठी तिने इतर महिला कारागीरांनाही प्रेरित केले आहे. या खेड्यातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देण्यात जीतन देवीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सध्या त्या झारखंड सरकारकडे नवीन मशीनची मागणी करीत आहेत, जेणेकरून त्या अधिकाधिक उत्पादने तयार करू शकतील. जीतनबरोबर जवळपास 30 महिला काम करत आहेत. इतर गावात जाऊन बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या, हेदेखील त्या महिलांना शिकवतात.
बांबूपासून बनवलेल्या वस्तू ही तिची परंपरा असल्याचे जीतन देवी यांचे मत आहे. त्या म्हणाल्या, की कोरोना साथीच्या काळातही आमची उत्पादने छठ पूजा आणि लग्नात विकली जात होती. या वस्तू बाजारात आणण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचा साठा करतो. जीतन देवी म्हणाल्या, की टाळेबंदी व त्यानंतरही बांबूच्या उत्पादनांची मागणी कमी झाली. अशा वेळी त्यांनी इतर बायकांसह एकत्र येत काही नवीन गोष्टी केल्या. राज्य आजीविका प्रमोशन सोसायटी अंतर्गत महिलांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ओडिशामध्ये राहताना जीतन देवी सात वर्ष बांबूची उत्पादने बनवायला शिकल्या. या प्रशिक्षण दरम्यान त्यांना दररोज दहा रुपये मिळवायचे. स्वत: शिकल्यानंतर, त्या आता आपल्या पतीसमवेत वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि लोकांना बांबूची उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण देतात.
पूर्वी बांबूपासून बनविलेल्या वस्तूव पदार्थ एक ते दोन हजार रुपयांना विकल्या जायच्या. मॉडर्न टचसह आता त्या दहा-बारा हजार रुपयांना विकल्या जातात. त्यांना विविध स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डरदेखील मिळतात. हे काम करत असताना त्यांना खूप आदरही मिळाला आहे.