मराठी

आयटीआय उत्तीर्णांसाठी 9 डिसेंबरला रोजगार मेळावा

अमरावती/दि. ७  – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती व्दारा मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र यांच्यामार्फत येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एन.एस. हॉलमध्ये दि. 9 डिसेंबर रोजी, सकाळी 10 वाजता  शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील वर्ष 2015, 2016, 2017, 2018 व 2019 या वर्षी आय. टी. आय. उत्तीर्ण  प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रासह या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ.एम. डी. देशमुख यांनी केले आहे.या मेळाव्याला HRVS, India Pvt.Ltd., Suzuki Motor Gujarat Private Limited या कपंन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून Fitter, Diesel Mech.MMV,Turner, Machinist,Welder,Electrician,
Tool & Diemaker,PPO, COE (Automobile), Tractor Mech.& Painter (G) आदी व्यवसाय ट्रेडसाठी पुरुष उमेदवारांची निवड होणार आहे. उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्ष असावे.
उपरोक्त व्यवसाय ट्रेडसाठी दहावी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण, आयटीआय ट्रेड 60 टक्क्यांनी उत्तीर्ण उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी उपरोक्तप्रमाणे कागदपत्रांच्या पूर्ण सेमिस्टरच्या मुळ गुणपत्रिका, ट्रेड प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व नुकतेच काढलेले छायाचित्र आदी दोन प्रतीत मेळाव्यात सोबत आणावे. या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही संस्थेच्या प्राचार्य यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button