मराठी

न्या. काटजू यांच्या साक्षीला भारत सरकारचे आव्हान

नीरव मोदी प्रकरण

लंडन/दि. १२ – नीरव मोदी(NIRAV MODI) याच्याविरोधात न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला एक रोचक वळण लागले आहे. या प्रकरणात भारताचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी साक्ष दिली. या साक्षीला भारत सरकारतर्फे उपस्थित असलेल्या वकिलांनी आव्हान दिले आहे. नीरव मोदी यांच्या वतीने काटजू यांनी साक्ष दिली. यावर भारत सरकारकडून या खटल्याचे प्रतिनिधित्व करणा-या वकिलांनी काटजू यांच्या साक्षीला आव्हान दिले. न्यायाधीश सॅम्युएल गुजी यांनी काटजू यांच्या साक्षीनंतर पुढील सुनावणी तीन नोव्हेंबरला तहकूब केली आहे. न्यायमूर्ती सॅम्युएल म्हणाले, की तीन नोव्हेंबरला ते भारतीय अधिका-यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात निर्णय घेतील.
काटजू यांनी लेखी व तोंडी दावा केला आहे, की भारतातील बहुतेक न्यायालयीन यंत्रणा भ्रष्ट आहे आणि म्हणूनच नीरव मोदी यांच्याबाबतीत भारतात न्याय्य सुनावणी होणार नाही. भारत सरकारकडून या प्रकरणाची बाजू मांडणा-या ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने (CPS) काटजू यांच्या वक्तव्याला आव्हान दिले. न्या. सॅम्युएल तीन नोव्हेंबरला सीपीएसची बाजू ऐकतील.
सुनावणीदरम्यान बॅ. हेलन माल्कम यांनी न्या. काटजू यांना विचारले, की तुम्ही स्वत: ची साक्ष द्यायला तयार असाल, तर तुम्ही काही बोलणे शक्य आहे का? यासंदर्भात काटजू म्हणाले, “आपणास आपले मत देण्याचा सर्व हक्क आहे.”

Back to top button