कंगनाला नोटीस पाठवून पोलीस फंडात 50 लाख रुपये देण्याची केली मागणी
मुंबई पोलिसांच्या माजी अधिकार्याने पाठविली नोटीस
मुंबई/दि.७– सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासोबतच मुंबईत सध्या कंगना राणौतचा वाद चिघळत चालला आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राविरोधात बदनामीकारक ट्वीट करणं अभिनेत्री कंगना राणौतला भोवणार असल्याचं दिसत आहे. कंगनाविरोधात गोरेगाव वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांविरूद्ध बदनामीकारक विधाने केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या माजी अधिकाऱ्याने कंगनाला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत असे म्हटले आहे की, कंगनाने हे ट्विट मागे घ्यावे आणि माफी मागावी अन्यथा तिच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. नाहीतर पोलीस फंडात 50 लाख रुपये देण्याची मागणीही केली आहे. 9 तारखेला मुंबईत आल्यानंतर पालिकेकडून कंगनाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, अशी चर्चा आहे.
कंगनाच्या ट्वीटमुळे महाराष्ट्र सरकारच्या अस्मितेला धक्का पोचला आहे. संपूर्ण देशाला आदर असलेल्या मुंबई पोलिसांना हिणवले असून एक भारतीय नागरिक आणि एक सामान्य मुंबईकर या नात्यान मला पटणारे नाही. मुंबईला पीओके असे म्हणून तिने संबंध महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल आहे. 9 सप्टेंबरला मी मुंबईत येत असून, कोण मला रोखतं ते बघू असे खुले आव्हान तिने महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा आणि मुंबई पोलिसाच्या प्रतिष्ठचा मुद्दा बनला असल्याचंही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. त्यविरोधात आदित्य सरफरे यांनी शनिवरी मुंबई अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात तक्रारीची प्रत पाठविण्यात आली. आता कगना विरोधात दोन दिवसात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर तिने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्न केल्याने भारतीय दंड विधान कलम 499 ,1क्कष्ट500 आणि 124्र लावण्यात यावे, अशा तक्रारदाराने विनंती केली आहे.
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.