कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
नवी दिल्ली/ दि.२३ – भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मते, याक्षणी कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने ३७ वर्षांपूर्वी पहिला वल्र्ड कप qजकला होता. दरम्यान, टाळेबंदी काळातील आपल्या नव्या लुकमुळे कपिल देव चर्चेत होते. कपिल देव यांनी मुंडन करून केवळ दाढी ठेवली होती. कपिल देव यांच्या या लुकचे कौतुक सेलिब्रिटीजनीही केले होते. १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाèया कपिल देव यांनी १३१ कसोटी सामने खेळले आहेत. कपिल देव यांनी न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांचा सर्वांत जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोडला. त्यांच्या नावावर ४३४ विकेट आहेत. भारताकडून सर्वांत जास्त विकेट घेण्याचा विक्रम आजही कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने ४३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या १८३ धावा केल्या होत्या; मात्र कपिल देव यांच्या शानदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजचा मजबूत संघ केवळ १४० धावा करू शकला.