मराठी

किसान आघाडी (भाजपा ) अंजनगाव सुर्जी कडून आंदोलनाचा इशारा

अंजनगाव सुर्जी दि २ :-  किसान आघाडी (भाजपा ) कडून अंजनगाव सुर्जी तहसीलदार व कुषी अधिकारी यांना निवेदन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांवर सोयाबीन आलेल्या व्हायरस झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सर सकट आर्थिक मदत द्यावी व विमा मंजूर करावा,अन्यथा किसान आघाडी (भाजपा )कडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवेदन देतेवेळी भाजप चे जेष्ठ नेते गजानन पाटील काळमेघ, किसान आघाडी चे तालुका अध्यक्ष सुधीर भाऊ गोळे ,उपाध्यक्ष सतीश पाटील बारब्दे,उपाध्यक्ष प्रतिक सुभाषराव मळसणे, मयूर कंकाळे, योगेश गोळे, अमित मेहकरे, विवेक ठाकरे, अनिल शिंगणे तसेच किसान आघाडी( भाजपा) चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button