मराठी

लालूप्रसाद यादव जामिनावर सुटणार ?

रांची/ दि.२४ – लालूप्रसाद यादव बिहार निवडणुकीच्या काळात दरम्यान तुरूंगातून बाहेर येऊ शकतात. लालूप्रसाद यांचे  चिंरजीव आणि राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या वाढगदिवशीच लालूप्रसाद तुरुंगातून सुटण्याची शक्यता आहे. दुमका चारा घोटाळा प्रकरणातील निम्मी शिक्षा लालू पूर्ण करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळण्याची शक्यता आहे. दुमका चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसादयादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचे वकील देवाशीष यांचे म्हणणे आहे, की नऊ नोव्हेंबरला लालूप्रसाद यादव यांची निम्मी शिक्षा भोगून पूर्ण होईल. साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी जामीन मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी विशेष विनंती केली जाईल. दुर्गापूजा संपल्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या जामीअर्जावर सुनावणी होऊ शकेल. असे देवाशीष यांनी सांगितले. लालूप्रसाद यांना झारखंड उच्च न्यायालयाने चाईबासा चारा घोटाळा प्रकरणात जामीनअर्ज मंजूर केला आहे; परंतु त्याच दिवशी न्यायालयाने लालूप्रसाद यांच्या आजाराची दखल घेत रिम्सकडून संपूर्ण अहवाल मागविला आहे. न्यायालयाने तुरूंग प्रशासनाला विचारले होते, की तुरूंगात असताना लालूप्रसाद किती माणसांना भेटले आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सहा नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. लालूंचे वकील देवाशीष त्याच दिवशी लालूंचा जामीनअर्ज सुनावणीला घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निम्मी शिक्षेचे कारण पुढे करून त्यांना जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अध्र्या शिक्षेच्या आधारे न्यायालयाने लालूंना जामीन मंजूर केला, तर तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसाची ही सर्वोत्कृष्ट भेट असेल.

Related Articles

Back to top button