मराठी
लालूप्रसाद यादव यांचा जामीनअर्ज दाखल
रांची/दि.२० – चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या वतीने झारखंड उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लालूप्रसाद यांचे वकील देवर्षि यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे, की लालूप्रसाद यादव यांनी आपल्या याचिकेत दुमका कोषागार प्रकरणात ४२ महिने तुरूंगात घालविला असल्याने आता त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी केली आहे. लालूप्रसाद यांच्या आजारपणाचे कारणही त्यासाठी दिले आहे.