मराठी

संत्रा निर्यातीस च्सिट्रस नेटज् नोंदणीस शुभारंभ

जिल्हा कृषि अधिकारी विजय चव्हाळे यांंचे नोंदणीचे आवाहन

वरुड/दि.१० – संत्रा निर्यातीस च्सिट्रस नेटज् नोंदणीस शुभारंभ झाला आहे, तरी तुम्ही नोंदणी करुन घ्या, असे आावाहन जिल्हा कृषि अधिकारी विजय चव्हाळे यांनी केले आहे.
देशाबाहेर संत्रा निर्यातीसाठी च्सिट्रस नेटज् नोंदणीसाठी फार्मर कनेक्ट मोबाईल अॅप अनलॉक करुन सिट्रस नेट नोंदणी फॉर्म भरावा अथवा संबंधित कृषि विभागाच्या कार्यालयात नोंदणी फॉर्म ७/१२, चुतर्सिमा व आधार कार्डची झेरॉक्स संच देण्यात यावा, असे आवाहन व बनावती नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रशिक्षण आयोजित केलेले होते. बनामतीचे संचालक तथा नागपुुरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे पुढाकाराने प्रशांत वाघमारे, महाबदलापक अॅपेडा मुंबई व गोविंद हांडे, निर्वात सल्लागार, सविस्तर मार्गदर्शन करुन सिट्रस नेट नोंदणीचे महत्व कार्यपद्धती विषद केली होती. त्या अनुषंगाने रियाज फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड तिवासाघाटचे अध्यक्ष व संत्रा निर्यातदार ताजखान मजनेखान यांचे हस्ते २१ शेतक:यांचे सिट्रस नेट नोंदणी प्रस्ताव अमरावती जिल्हा कृषि अधिकारी विजय चव्हाळे यांचेक डे देवुन शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी श्रमजिवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार, अनिल लेकुरवाळे, सुधाकर बेले, क य्युमभाई, एकनाथ जिचकार, अनिल काळे, राजा कराळे, सुशील मोहोड, भुराभाई, मंगेश सरोदे, नंदु काळे, हितेश खेरडे तसेच कृषि विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषि अधिकारी संतोष सातदिवे, डॉ.पजांबराव.कृषि.विद्यापीठाचे डॉ.हेमंत डिके, पोकराचे शिवाजी केंडे, हेमंत बरांगे, लक्ष्मीकांत श्रीराव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button