मराठी

शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते

वरुड/दि.२३  – शहरात आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
वरुड येथील खरेदी विक्री संघात शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबिन उत्पादक शेतक:यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसिलदार किशोर गावंडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाराव बहुरुपी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती अनिल गुल्हाने, संचालक अनिल सुपले, मुकेश देशमुख, ज्ञानेश्वर यावले, संजय राऊत, व्यवस्थापक विलास चौधरी, सचिव नंदुुभाऊ बोडखे, भानुदास देशमुख, अनिल गुल्हाने, सुनिल कडू, राहुल गावंडे, गुड्डुठाण, गौरव गणोरकर, हर्षल गलबले, संजय निकम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button